मेरठ : बिजनौर येथील मुख्याध्यापकाला प्रेमलीलांसाठी शाळेला लवकर सुटी देणे महागात पडले. या प्रेमी शिक्षक युगुलाला निलंबित तर करण्यात आलेच; शिवाय अटकही करण्यात आली.बागडपूर भागातील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचे दुसऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर प्रेम जडले होते. प्रेयसीसोबत एकांतात राहता यावे म्हणून तसलीम हमिदी नामक या मुख्याध्यापकाने तीन तास आधीच शाळा सोडली. मुलांना वेळेपूर्वीच घरी आलेले बघून पालकांनाही आश्चर्य वाटले. लवकर सुटी का दिली हे बघण्यासाठी काही पालक शाळेत गेले तेव्हा तेथील प्रकार बघून त्यांना धक्का बसला. (वृत्तसंस्था)
‘प्रेमलीलां’साठी शाळेला लवकर सुटी
By admin | Updated: August 21, 2015 08:55 IST