शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी प्रवाशांसाठी ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य, १ एप्रिलपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 10:58 IST

यासंदर्भातील नवीन प्रवास नियम येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

नवी दिल्ली: भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांनी आगमनापूर्वी ७२ तासांच्या आत डिजिटल ई-अरायव्हल कार्ड सबमिट करणे अनिवार्य आहे. हे अधिकृत अॅप्स किंवा संकेतस्थळांद्वारे केले जाऊ शकते. यासंदर्भातील नवीन प्रवास नियम येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

विदेशी प्रवासी दुसऱ्या देशात आगमनापूर्वी विमानात, विमानतळावर कागदी अर्ज भरत असत. आता त्याची जागा ई-अरायव्हल कार्ड या सुलभरीत्या भरता येईल अशा ऑनलाइन अर्जाने घेतली आहे. त्यामुळे भारतात प्रवेश करण्याची प्रक्रिया जलद होते आणि प्रतीक्षा वेळ कमी होतो.

योजना भारत का राबवणार आहे?

सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएईमध्ये ई-अरायव्हल कार्डची योजना आहे. परदेशी प्रवासी भारतात आल्यानंतर त्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदी फॉर्म भरावे लागत. त्यात काही समस्या उद्भवत होत्या. हा फॉर्म ऑनलाइन भरता येत असल्याने बनावट नोंदींना रोखता येते. म्हणून भारतही ही योजना राबविणार आहे.

विसरल्यास, टाळल्यास काय होईल ? ई-अरायव्हल कार्ड भरणे विसरलात किंवा टाळलेत तरी तुम्ही भारतात प्रवेश करू शकता. त्यासाठी बंदी किंवा दंड नाही. पण, अतिरिक्त तपासणीसाठी इमिग्रेशन तुम्हाला बाजूला घेईल, रांगा लांबतील आणि प्रवास ताणतणावयुक्त होईल.

कोणती माहिती आवश्यक आहे? 

पासपोर्टचा क्रमांक, पासपोर्ट जारी केल्याची व तो संपुष्टात येणार असल्याची तारीख येणार

विमानाचा तपशील : क्रमांक, आगमन तारीख, विमानतळ प्रवाशाचा फोन नंबर आणि ईमेल भेटीचे कारण (पर्यटन, काम, अभ्यास) भारतातील निवासस्थान (हॉटेलचे नाव व पत्ता)

अर्ज कुठे भरता येईल ? हा अर्ज भरण्यासाठी तीन अधिकृत मार्ग आहेत. ही मोफत सेवा आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनचे संकेतस्थळ : boi.gov.in इंडियन व्हिसा ऑनलाइन पोर्टल : indianvisaonline.gov.in Su-Swagatam अॅप

ई-अरायव्हल कार्ड म्हणजे काय? 

डिजिटल ई-अरायव्हल कार्डसाठी ऑनलाइन अर्ज फोन किंवा संगणकाद्वारे भरता येईल. विमानाच्या आगमनापूर्वी ७२ तासांच्या आत हा अर्ज भरून सादर करा. त्यानंतर संबंधित प्रवाशाला क्यूआर कोड मिळतो. भारतात विमानतळावर उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना हा कोड दाखवा, ते तो स्कॅन करतील भारतात प्रवेशाची प्रक्रिया लवकर पार पडेल.

कोणत्या प्रवाशांनी हे अर्ज भरायचे

भारतीय नागरिकांना डिजिटल ई-अरायव्हल कार्डसाठी अर्ज भरायची गरज नाही. परदेशी प्रवासी आणि ओव्हरसीज सिटिझनच दर्जा असलेल्यांना हा अर्ज करावा लागेल. या पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक हे प्रवासी समाविष्ट आहेत. एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांची नावे एका अर्जात नमूद करता येतील.

English
हिंदी सारांश
Web Title : E-Arrival Card Mandatory for Foreign Travelers to India from April 1

Web Summary : Foreign travelers to India must submit a digital E-Arrival Card within 72 hours before arrival starting April 1. This speeds up immigration. It's not mandatory, but recommended to avoid delays. Apply via boi.gov.in, indianvisaonline.gov.in, or Su-Swagatam app. Indian citizens are exempt.
टॅग्स :Airportविमानतळ