शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

द्विवेदींना मोदींची स्तुती भोवणार!

By admin | Updated: January 23, 2015 01:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याबद्दल सर्वात ज्येष्ठ सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे संकेत काँग्रेसने दिले आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याबद्दल सर्वात ज्येष्ठ सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. ६९ वर्षीय द्विवेदी यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली असली तरी यावेळी मोदींची स्तुती त्यांना भोवणार असेच दिसते.मी मोदींची प्रशंसा केलेली नसून माझ्या विधानाचा विपर्यास केला असल्याचे सांगत द्विवेदींनी सारवासारव चालविली असतानाच काँग्रेसचे दुसरे सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रपरिषद घेत द्विवेदींना जाहीररीत्या फटकारले आहे. माकन म्हणाले ते काँग्रेसच्या भारतीयत्वाच्या विचारसरणीशी पूर्णपणे विसंगत आहे. मोदींचा विजय हा भारतीयत्वाचा विजय ठरवता येत नाही. पक्ष द्विवेदी यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचेही माकन यांनी स्पष्ट केले. माकन हे सध्या काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख आहेत. द्विवेदी हे यापूर्वी अ.भा. काँग्रेस समितीच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख राहिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोदी भारतीयत्वाचे प्रतीक ठरत नाहीत !सात महिन्यांची पंतप्रधानपदाची राजवट असो की ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये २००२ साली उफाळलेल्या जातीय दंगली असोत, कुणालाही मोदींमध्ये भारतीयत्वाचे प्रतीक दिसणार नाही, असे माकन यांनी स्पष्ट केले. गेल्या सात महिन्यांमध्ये दिल्लीत राष्ट्रपती राजवट असून मोदी हेच सरकार चालवत आहेत. या काळात त्रिलोकपुरी आणि बवाना भागात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा नेतृत्वात भारतीयत्वाचे प्रतीक कसे बघता येणार? मोदींच्या सरकारमधील मंत्री आक्षेपार्ह भाषा बोलत असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही हे कशाचे निदर्शक आहे, असा सवालही माकन यांनी केला.