ढवळीकरांचे फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र; गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 10, 2014 02:32 IST2014-07-10T02:32:14+5:302014-07-10T02:32:14+5:30

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बिकिनी घातलेले पोस्टर प्रसिद्ध केल्यामुळे एका तरुणावर गुन्हा दाखल झालेला आहे.

Dwavikar's objectionable picture on Facebook; Filed the complaint | ढवळीकरांचे फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र; गुन्हा दाखल

ढवळीकरांचे फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र; गुन्हा दाखल

पणजी : सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बिकिनी घातलेले पोस्टर प्रसिद्ध केल्यामुळे एका तरुणावर गुन्हा दाखल झालेला आहे. सावियो आल्मेदा (सध्या रा. फोंडा) असे संशयिताचे नाव आहे. हा गुन्हा बुधवारी फोंडा पोलिसांकडून पणजीतील सायबर गुन्हे विभागाकडे वर्ग केला आहे. अमेरिकेत राहत असलेले आल्मेदा अनिवासीय भारतीय आहेत.
आल्मेदा यांच्या लॉगईनवरून हे चित्र सोशल माध्यमात प्रसिद्ध झाले. यानंतर स्थानिक नागरिक प्रदीप बखले यांनी संशयिताविरुद्ध फोंडा पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली होती. त्यानंतर फोंडा पोलिसांनी महिती तंत्रज्ञान कायद्याच्या 66 (बी) आणि 67 कलमा अंतर्गत या प्रकरणात गुन्हा नोंदविला होता. बुधवारी हे प्रकरण गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाकडे सोपविले आहे. फोंडा पोलिसांकडून ही माहिती दिली.
दरम्यान, हे प्रकरण आपल्या विभागाला मिळाले नसल्याचे विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी म्हटले आहे. ही एफआयआर पोलीस टपालाने पाठविल्याची माहिती सूत्रंनी दिली. गुन्हा नोंदविल्यानंतर फेसबूकवरून आक्षेपार्ह चित्र हटविले; परंतु त्या चित्रच्या प्रती तक्रारदाराने पोलिसांना दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह चित्र फेसबूकवर प्रसिद्ध केल्याबद्दल गोव्याच्याच देऊ चोडणकर या युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. (प्रतिनिधी)
 
च्ढवळीकर यांनी समुद्रकिना:यांवर बिकिनी घालून फिरू नये, असे विधान केले होते. पबमध्ये मुलींनी तोकडे कपडे घालून जाऊ नये, असेही ते म्हणाले होते. 
च्त्यांच्या या विधानांवरून मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यांचा निषेध म्हणून हे आक्षेपार्ह पोस्टर फेसबूकवर प्रसिद्ध केले होते.

 

Web Title: Dwavikar's objectionable picture on Facebook; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.