मंत्र्याच्या पत्नीऐवजी ‘डमी’ परीक्षार्थी
By Admin | Updated: August 5, 2015 23:16 IST2015-08-05T23:16:11+5:302015-08-05T23:16:11+5:30
छत्तीसगडचे शालेय शिक्षण मंत्री केदार कश्यप यांच्या पत्नी शांती कश्यप यांच्याऐवजी एका डमी महिला उमेदवाराने बस्तरच्या लोहांडीगुडामधील केंद्रात

मंत्र्याच्या पत्नीऐवजी ‘डमी’ परीक्षार्थी
रायपूर: छत्तीसगडचे शालेय शिक्षण मंत्री केदार कश्यप यांच्या पत्नी शांती कश्यप यांच्याऐवजी एका डमी महिला उमेदवाराने बस्तरच्या लोहांडीगुडामधील केंद्रात एम.ए. इंग्रजी विषयाची परीक्षा दिल्याचे उघडकीस आल्याने बुधवारी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या घटनेविरुद्ध काँग्रेसने रायपूरपासून जगदलपूरपर्यत निदर्शने आणि धरणे आंदोलन केले. शालेय शिक्षण मंत्र्याच्या दोन्ही शहरांमधील निवासस्थानी घेराव करण्यात आला. दरम्यान काँग्रेसच्या १५६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणामुळे केदार कश्यप यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दुसरीकडे पंडित सुंदरलाल शर्मा मुक्त विद्यापीठाने या घटनेला दुजोरा देऊन दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. एम.ए. अंतिम वर्षाच्या इंग्रजी साहित्य या विषयाची परीक्षा शांती कश्यप यांच्याऐवजी किरण मौर्या नामक एका महिलेने दिली होती.
विद्यापीठाचे कुलगुरू बंशगोपाल सिंग यांनी सांगितले की, शांती कश्यपच्या जागी परीक्षा देणाऱ्या महिलेची विचारपूस केली असता ती प्रश्नपत्रिकेसह पळून गेली. लोहांडीगुडा पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा नोदविण्यात आला असल्याची माहिती आहे. (वृत्तसंस्था)