Shocking LockDown मुळे बायको अडकली माहेरी अन् त्यानं मेहुणीबरोबरच थाटला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 03:04 PM2020-05-18T15:04:28+5:302020-05-18T15:05:11+5:30

पत्नीला हे कळताच पीडित महिलेने 'मेरा हक फॉऊंडेशन'कडे मदतीसाठी धाव घेतली. यानंतर नव-याने दोन बायका जवळच ठेवण्याचे सांगितले. 

Due to LockDown, Shocking wife got stuck and he got married again to his sister-in-law | Shocking LockDown मुळे बायको अडकली माहेरी अन् त्यानं मेहुणीबरोबरच थाटला विवाह

Shocking LockDown मुळे बायको अडकली माहेरी अन् त्यानं मेहुणीबरोबरच थाटला विवाह

googlenewsNext

जगात कोणी काय करेल याचे सांगता येणेच कठीण आहे. भल्याभल्यांना विचार करायला भाग पाडतील, अशा आश्चर्यकारक घटना घडत असतात. लॉकडाऊनदरम्यानही अशा बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. एका व्यक्तीने पत्नी लॉकडाऊनमुळे माहेरी अकडल्याचा फायदा घेत चक्क दुसरा विवाह केला आहे. नईम मन्सुरी असे या इसमाचे नाव आहे. पहिल्या पत्नीपासून याला तीन मुलं आहेत. 22 मार्च रोजी कर्फ्यू आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्याची पत्नी माहेरीच अडकली. 

19 मार्च 2020 रोजी नईमने नसीमला तिच्या माहेरी सोडलं होतं. याच गोष्टीचा फायदा घेत त्याने चक्क दुसर लग्न करण्याचा घाट घातला. दुसरे लग्न करण्यासाठी उतावीळ झालेली व्यक्ती घटस्फोटाची प्रक्रियादेखील पूर्ण न करता पुन्हा बोहल्यावर चढली. 

ज्या मुलीबरोबर नईमने लग्न केले ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच मेहुणी होती. आश्चर्याची बाब म्हणजे  पीडित महिला नसीमला तिच्याच चार वर्षांच्या मुलानं फोनवरून वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती दिली. हा प्रकार समोर येताच अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. पत्नीला हे कळताच पीडित महिलेने 'मेरा हक फॉऊंडेशन'कडे मदतीसाठी धाव घेतली. यानंतर नव-याने दोन बायका जवळच ठेवण्याचे सांगितले. 

मात्र पीडित महिला यासाठी तयार नाही. कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. आता कोर्टच याचा काय तो निर्णय घेणार असल्याचे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे पोलीस याकडे कशा रीतीने कारवाई करतात हे पाहावे लागेल.

Read in English

Web Title: Due to LockDown, Shocking wife got stuck and he got married again to his sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.