शाळेत स्वच्छतागृह नसल्याने २५ शिक्षकांचे वेतन रोखले

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:23+5:302015-02-14T23:52:23+5:30

शहदोल (मध्यप्रदेश) : शाळेत स्वच्छतागृह न बांधलेल्या २५ शिक्षकांचे वेतन मध्यप्रदेशात रोखण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी ही कारवाई केली.

Due to lack of sanitary toilets, the salary of 25 teachers has been stopped | शाळेत स्वच्छतागृह नसल्याने २५ शिक्षकांचे वेतन रोखले

शाळेत स्वच्छतागृह नसल्याने २५ शिक्षकांचे वेतन रोखले

दोल (मध्यप्रदेश) : शाळेत स्वच्छतागृह न बांधलेल्या २५ शिक्षकांचे वेतन मध्यप्रदेशात रोखण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी ही कारवाई केली.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर अखेरपर्यंत स्वच्छतागृहांचे बांधकाम करायचे होते. मात्र, तपासणीदरम्यान अनेक शाळांमध्ये संबंधित शिक्षकांनी ही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याचे आढळून आले, असे शहदोलचे जिल्हाधिकारी डॉ. अशोक कुमार भार्गव यांनी सांगितले.
ही बाब गांभीर्याने घेत डॉ. भार्गव यांनी २५ शिक्षकांचे वेतन पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेश दिले. या सर्व शाळांमध्ये शिक्षक-पालक संघटना असतानाही स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आलेले नाही.

Web Title: Due to lack of sanitary toilets, the salary of 25 teachers has been stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.