शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 22:41 IST

उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली.  या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली.  या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही जण इमारतीत अडकले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाडया आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. 

आगीवर आता नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वप्रथम इमारतीच्या तळ मजल्यावर आग भडकली. नेमकी कशामुळे ही आग लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण प्लास्टिकमुळे ही आग वेगाने पसरली. आग लागली त्यावेळी कारखान्यात कामगार काम करत होते. आग वेगाने पसरल्यामुळे अनेक महिलांना बाहेर पडता आले नाही. खालचे मजले आगीच्या ज्वाळांनी वेढल्यामुळे काही कामागारांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरुन उडल्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले आहेत. 

 

संध्याकाळी 6.20 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच 10 गाडया घटनास्थळी पाठवल्या असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करुन आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. दिल्ली सरकार बचाव मोहिमेवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या दुर्घटने प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असे दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. मुंबईमध्येही अलीकडच्या काही दिवसात आगी लागण्याच्या मोठया घटना घडल्या असून त्यात अनेकांचा मृत्यू झाला.                                                                                                                                                                     

 

टॅग्स :fireआग