शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

भय्यू महाराजांचा मृत्यू ब्लॅकमेलिंग, फसवणुकीमुळे; मुलगी कुहूने मौन सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 5:45 AM

ब्लॅकमेलिंग व फसवणुकीमुळे वडिलांचा मृत्यू झाला, असा आरोप भय्यू महाराज यांच्या कन्या कुहू यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. माझी काळजीवाहक म्हणविणाऱ्या त्या तरुणीने वडिलांच्या बेडरुमवर कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला.

इंदूर : ब्लॅकमेलिंग व फसवणुकीमुळे वडिलांचा मृत्यू झाला, असा आरोप भय्यू महाराज यांच्या कन्या कुहू यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. माझी काळजीवाहक म्हणविणाऱ्या त्या तरुणीने वडिलांच्या बेडरुमवर कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला.पोलीस या तरुणीसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजता आयुषी (महाराजांच्या पत्नी) यांच्यासोबत कुहू जबाब देण्यास तेजाजी नगर पोलीस ठाण्यात पोहोचल्या. मुख्य पोलीस अधीक्षक अगम जैन यांनी त्यांना ३० प्रश्न विचारले. त्या तरुणीसंबंधीही कुहू यांच्याकडे चौकशी केली. आपण कुहू यांच्या काळजीवाहक आहोत, असे त्या तरुणीने सांगितले होते.ती माझी काळजीवाहक नव्हती, असे स्पष्ट करत कुहू यांनी सांगितले की, मी पुणे येथे राहत होते, तेव्हाही ही तरुणी घरात रहायची. तिने संपूर्ण घरासह वडिलांच्या बेडरुमवरही कब्जा केला होता. याच तणावमुळे वडिलांनी मृत्यू पत्करला. कुहू यांना चौकशीसाठी पुन्हा बोलाविण्यात आले आहे. आता केवळ तोंडी चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आयुषी यांचाही जबाब घेतला जाईल, असे मुख्य पोलिस अधीक्षकांनी सांगितले.३१ डिसेंबर रोजी त्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते की, गुरुजी मला त्यांची कन्या कुहूप्रमाणे मानायचे. गुरुजींनी मला कुहूचे काळजीवाहक केले होते. मी कधीच गुरुजींना एकटी भेटली नाही. तसेच फोनवरूनही बोलले नव्हते. मला कन्या मानून माझ्याकडून वैयक्तिक बाबतीत सल्ला घ्यायचे. त्यामुळे लोकांना असे वाटायचे की, मी त्यांची खास आहे. त्याच कारणामुळे कुहूसुद्धा माझा द्वेष करायची, असे सांगत त्या तरुणीने ब्लॅकमेलिंग आणि लुबाडणूकीचा आरोप फेटाळून लावला.‘तिच्या’बहिणीच्या लग्नात महाराजांनी केला खर्चया प्रकरणात महाराजांच्या आई कुमुदनी यांचा जबाब महत्वाचा आहे. त्यांनी औपचारिक चर्चेत अधिकाºयांना सांगितले की, तरुणीने घरात ताबा मिळविला होता. महाराजांना वश केले होते. मोबाइल, सूटच्या बिलावरुन असे दिसून येते की, तरुणीने महाराजांना धमकावून लाखो रुपयांच्या वस्तू घेतल्या होत्या.तरुणी, विनायक, शरदविरुद्ध पुरावे मिळालेपोलिसांना तरुणी, विनायक, शरदविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. ते ब्लॅकमेलिंग, धमकीचे पुरावे जमा करत आहेत. यात महत्त्वाचे पुरावे तरुणी व विनायकचा तो फोटो आहे जो विवाहाच्या दिवशी कॅमेºयात कैद झाला. कॉन्ट्रॅक्टर मनमीत अरोराने जे सांगितले त्यावरुन पोलिसांना केस दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अरोराने सरकारी साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली आहे. तरुणीसह महाराजांना गुजरातला नेल्याची त्याने कबुली दिली आहे.पोलीस आता सर्वांचे जबाब पुन्हा घेत आहेत. संशयाची सुई महाराजांचे निकटचे विनायक दुधाळे, मनमीत अरोरा आणि एक तरुणी यांच्याभोवती फिरत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या महाराजांच्या समर्थकांनी डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांना भेटून या प्रकरणी पुन्हा तपास करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराज