हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी केलेल्या डीएसपीला पाच महिन्यांनी जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 06:50 PM2020-06-19T18:50:34+5:302020-06-19T18:55:00+5:30

या प्रकरणात थेट पोलिसांवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दविंदर सिंगविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नाही. निर्धारित वेळेत दोषारोपपत्र दाखल केले नाही तर आरोपी कोर्टाकडे जामीन मागू शकतो. त्यामुळेच दविंदर सिंग यांना पाच महिन्यांनी जामीन मंजूर करण्यात आला. 

The DSP, who had joined hands with two Hezbollah terrorists, was granted bail after five months | हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी केलेल्या डीएसपीला पाच महिन्यांनी जामीन मंजूर

हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी केलेल्या डीएसपीला पाच महिन्यांनी जामीन मंजूर

Next
ठळक मुद्देनिलंबित डीएसपी दविंदर सिंग याच्याविरोधात दिल्ली पोलिस आरोपपत्र दाखल करू शकले नाही, असे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसमवेत पकडलेल्या डीएसपी देविंदर सिंगलाही शौर्यासाठी पदक देण्यात आले होते. जम्मू-काश्मीर प्रशासनाने ते परत घेण्याचे आदेशही जारी केले होते.

जम्मू-काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांसह कारमध्ये पकडलेल्या डीएसपी दविंदर सिंगला जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या कोर्टाने दविंदर सिंग यांना जामीन मंजूर केला आहे. निलंबित डीएसपी दविंदर सिंग याच्याविरोधात दिल्ली पोलिस आरोपपत्र दाखल करू शकले नाही, असे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला आहे.

या प्रकरणात थेट पोलिसांवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दविंदर सिंगविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नाही. निर्धारित वेळेत दोषारोपपत्र दाखल केले नाही तर आरोपी कोर्टाकडे जामीन मागू शकतो. त्यामुळेच दविंदर सिंग यांना पाच महिन्यांनी जामीन मंजूर करण्यात आला. 

जानेवारीत दविंदर सिंगला पकडण्यात आले
दविंदर सिंगला यावर्षी ११ जानेवारी रोजी पोलिसांच्या पथकाने कुलगाममधील मीर बाजार येथून दहशतवाद्यांसह अटक केली होती. या दिवशी तो कर्तव्यावर हजर नव्हता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिंग यांनी १२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत सुट्टी घेण्यासाठी अर्ज केला होता. सिंग यांनी एसपी म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यांत ते एसपी होणार होता.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसमवेत पकडलेल्या डीएसपी देविंदर सिंगलाही शौर्यासाठी पदक देण्यात आले होते. जम्मू-काश्मीर प्रशासनाने ते परत घेण्याचे आदेशही जारी केले होते. दहशतवाद्यांसमवेत डीएसएपी दर्जाच्या अधिकाऱ्याला  पकडणे हे एक मोठे यश मानले जात होते. त्यानंतर दविंदर सिंगलाही दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले होते की, ते दहशतवाद्यांसमवेत पकडलेल्या डीएसपी देविंदर सिंगबरोबर दहशतवाद्यांसारखेच वागणूक देत आहेत. त्यावेळी जम्मू काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी अटक केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “शोपियाचे एसपी यांना एक सूचना मिळाली होती की, दोन दहशतवादी आय -10 कारमधून निघाले आहेत आणि राष्ट्रीय महामार्गावर जम्मूला जात आहेत. एसपीने मला सांगितले आणि मी दक्षिण काश्मीरचे डीआयजी यांना त्यांच्या भागात नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले. नाकाबंदीदरम्यान दोन वॉन्टेड असलेले दहशतवादी कारमधून सापडले होते आणि त्यांच्याबरोबर आमच्या फोर्सचा एक डीएसपीही सापडला. तेथे स्थानिक अ‍ॅडव्होकेटही होते. "

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

Shushant Singh Rajput : सावधान! सुशांतच्या आत्महत्येनंतर पुन्हा असे प्रकार घडल्यास चित्रपट होऊच देणार नाही, मनसेचा इशारा

 

Shushant Singh Rajput : १५ वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या, तिच्या डायरीत असे लिहिले होते सुशांतबद्दल  

Web Title: The DSP, who had joined hands with two Hezbollah terrorists, was granted bail after five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.