शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर अंडरवेअर वाळत घातली म्हणून सामाजिक कार्यकर्त्याविरोधात दाखल केला गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 11:29 IST

चक्क उघड्यावर अंडरवेअर वाळत घातली म्हणून पोलिसांनी एका सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - चक्क उघड्यावर अंडरवेअर वाळत घातली म्हणून पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडली असून, मुझफ्फरनगरमध्ये गेल्या २४ वर्षांपासून भ्रष्टाचार, भूखंडमाफिया यांच्याविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते मास्टर विजय सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी उघड्यावर अंडरवेअर वाळत घातल्याने गुन्हा दाखल केला आहे. मुझफ्फरनगरच्या डीएम सेल्जा कुमारी यांनी मास्टर विजय सिंह यांना धरण्यावरून उठवले होते.  डीएमनी केलेल्या कारवाईनंतर मास्टर विजय सिंह यांनी आपले धरणे आंदोलन शिव चौक येथे सुरू केले होते. दरम्यान, मास्टर विजय सिंह यांच्याविरोधात सिव्हिल लाइन ठाण्यात कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. संजय कुमार यांनी आंदोलनस्थळी अंडरवेअर वाळत घातल्याच्या आरोपाखाली विजय सिंह यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.  कलम ५०९ अंतर्गत स्त्रियांमध्ये लज्जा उत्पन्न करणारे वर्तन केल्याचा आरोपाखाली कारवाई होते.  दरम्यान, विजय सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान, मास्टर विजय सिंह यांनी आपण माघार घेणार नसल्याचे सांगितले. ''मी माघार घेणार नाही, शेवटपर्यंत संघर्ष करत राहीन, मग मला फाशी दिली तरी बेहत्तर,'' असे त्यांनी सांगितले. तसेच वाळत घातलेली अंडरवेअर आपली नव्हती तर ती तिथे राहणाऱ्या एका निराधार व्यक्तीची होती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. दाखल करण्यात आलेला हा गुन्हा म्हणजे आपले आंदोलन संपवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप विजय सिंह यांनी केला. विजय सिंह गेल्या २४ वर्षांपासून आंदोलन करत असून, भ्रष्टाचाराविरोधात दीर्घकाळ आंदोलन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद झाला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीsocial workerसमाजसेवकPoliceपोलिस