'टल्ली' पोलिसाने केलं महिला पोलिसासमोर हस्तमैथून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 04:42 PM2017-07-26T16:42:22+5:302017-07-26T18:53:43+5:30

राजधानी दिल्लीमधून एक घृणास्पद वृत्त आलं आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलसमोर चक्क हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार

Drunk police constable musterbate infront woman constable | 'टल्ली' पोलिसाने केलं महिला पोलिसासमोर हस्तमैथून

'टल्ली' पोलिसाने केलं महिला पोलिसासमोर हस्तमैथून

Next

नवी दिल्ली, दि. 26 - राजधानी दिल्लीमधून एक घृणास्पद वृत्त आलं आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलसमोर चक्क हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घृणास्पद कृत्यानंतर आरोपी कॉन्स्टेबलला निलंबीत करण्यात आलं आहे. तसंच घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलीस ट्रेनिंग कॅम्पमध्ये ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी जवळपास 6 वाजेच्या सुमारास आरोपी कॉन्स्टेबल दारूच्या नशेत महिला कॉन्स्टेबल असलेल्या ठिकाणी आला.  त्यावेळी महिला कॉन्स्टेबल उपाहार करत होत्या. आरोपी एका महिलेच्या मागे जाऊन बसला. थोड्यावेळात त्याने महिलेसोबत अश्लिल कृत्य करण्यास सुरूवात केली. त्या महिलेने या गोष्टीचा तीव्र विरोध केला.   

या प्रकारानंतर काही महिला कॉन्स्टेबलनी वरिष्ठ अधिका-यांना घडलेला प्रकार सांगण्याची धमकी आरोपी कॉन्स्टेबलला दिली.  धमकीमुळे आरोपी माफी मागून तेथून निघून गेला. मात्र, थोड्याच वेळात आरोपी आपल्या छतावर पोहोचला. त्याने आपले कपडे उतरवण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने एका महिला कॉन्स्टेबलसमोर चक्क हस्तमैथून करण्यास सुरूवात केली.  

त्याचं हे कृत्य पाहून काही महिलांनी अलार्म वाजवला आणि वरिष्ठ अधिका-यांना त्याबाबत तक्रार केली. तक्रार मिळताच वरिष्ठ अधिका-यांनी आरोपी कॉन्स्टेबलला निलंबीत केलं. विशेष म्हणजे आरोपीला तेथे महिला कॉन्स्टेबलच्या ट्रेनिंगसाठी ठेवण्यात आलं होतं . आरोपीला निलंबीत केल्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  
 

Web Title: Drunk police constable musterbate infront woman constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.