शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

भरधाव वेगानं येणाऱ्या ऑडी कारनं रिक्षाला उडवलं; घटनेचं थरारक CCTV फुटेज समोर, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 14:51 IST

हैदराबादच्या सायबराबाद परिसरातील इनऑर्बिट मॉलजवळ एका भरधाव वेगात येणाऱ्या ऑडी कारनं ऑटोरिक्षाला मागून येऊन जोरदार धडक दिली.

हैदराबादच्या सायबराबाद परिसरातील इनऑर्बिट मॉलजवळ एका भरधाव वेगात येणाऱ्या ऑडी कारनं ऑटोरिक्षाला मागून येऊन जोरदार धडक दिली. यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका ३७ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बेदरकार कार चालकाला अटक केली असून चालक दारुच्या नशेत कार चालवत होता अशी माहिती समोर आली आहे. जुबली हिल्स परिसरातून एक युवक पार्टीहून परतत होता. मद्यपान केलेलं असतानाही तो स्वत: ड्रायव्हिंग करत निघाला होता. याचवेळी त्यानं एका ऑटोरिक्षाला मागून येऊन जोरदार धडक दिली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून घडलेली घटना किती भयंकर होती हे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. 

पोलिसांनी 'हिट अँड रन'प्रकरणी आरोपी सुजीत, त्याचे वडील रघुनंदन रेड्डी आणि त्याचा मित्र आशिष या तिघांनाही अटक केली आहे. सुजीत मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता आणि त्याच्यासोबत त्याचे वडील आणि मित्र आशिष देखील कारमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे. सुजीतचं कारवर नियंत्रण राहिलं नाही आणि त्यानं एका रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. पण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला आहे. 

एक ऑडी कार मागून येऊन रिक्षाला जोरदार धडक देत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. याच फुटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रिक्षाचालक आणि एक प्रवासी त्यावेळी रिक्षात  होता. अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झालाय, तर रिक्षाचालक जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Accidentअपघातhyderabad-pcहैदराबादCrime Newsगुन्हेगारी