शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

नमकीन कारखान्यावर औषध प्रशासनाची धाड

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: वेगवेगळ्या नावाचे लेबलही जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: वेगवेगळ्या नावाचे लेबलही जप्त
फोटो- बोचरे..
सोलापूर: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. परिसरातील बेकायदेशीर सुरु असलेल्या यश पॅकिंग फूड्सवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली असून दोन लाख 81 हजार 883 रुपयांचा नमकीनचा साठा जप्त केला आहे.
सोलापूर शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीररित्या नमकीन फूड्स पॅकिंग केले जाते. अशा पॅकिंगसाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची परवानगी घेतली नाही व नियमाप्रमाणे फूड बनविलेही जात नाही. बुधवारी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी यश नमकीन पॅकिंगवर धाड टाकली. यावेळी अक्कलकोट रोडवर फूड तयार करुन तेथेच पॅकिंग केले जात असताना विविध पत्त्याचे लेबल चिकटावले जात असल्याचे अन्नसुरक्षा अधिकार्‍यांच्या तपासणीत लक्षात आले. स्वत:च्या कारखान्याचे लेबल व अन्य लेबल जप्त करण्यात आले. अशा प्रकारच्या केलेल्या विविध प्रकारच्या लेबलमधील ‘पॅकिंग’पुड्या जप्त केल्या. यश नमकीनचे मालक गिरीधारी निरंकारी असल्याचे सांगण्यात आले.
0 यश फूड प्रोडक्टला अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नाही
0 प्रभारी सहाय्यक आयुक्त (अन्न) नीलेश मसारे, अन्नसुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम, विठ्ठल लोंढे यांनी केली कारवाई
0 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले
0 ‘कॉर्नफुल’(मद्यार्क) चा होत होता वापर
0 मोनोसोडियम ग्लुटामेट (आजिनिमोटो) चा चव वाढीसाठी केला जात होता वापर
0 पोगो, ‘व्हीलस्’, ‘एस.एम.एस.’ या आकर्षक नावाचे लेबल पॅकिंग
चौकट
बालकांसाठी रंग धोकादायक
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी जप्त केलेला रंग लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ‘सिंथेटिक’ रंग वापरून नमकीन तयार केले जात होते. हा रंग लहान मुलांसाठी धोकादायक आहे. तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे.
कोट
शहर व जिल्?ात अशा प्रकारच्या बेकायदेशीर सुरू असलेल्या ‘नमकीन’ तयार करणार्‍या ठिकाणावर धाडी टाकण्यात येतील. नागरिकांनी अशा ठिकाणची माहिती आम्हाला कळवली पाहिजे. लहान मुलांच्या जीवाला धोका होईल, असे पदार्थ तयार करणार्‍यांवर कारवाई करणार.
नीलेश मसारे
प्र. सहाय्यक आयुक्त (अन्न)