राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? ‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध; पाहा, कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:48 PM2022-07-25T12:48:36+5:302022-07-25T12:52:12+5:30

देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेतली आहे. जाणून घ्या...

droupadi murmu oath ceremony as president of india why is swearing in ceremony of president on july 25 know history and significance | राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? ‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध; पाहा, कारण

राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? ‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध; पाहा, कारण

googlenewsNext

नवी दिल्ली:द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ गेतली. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांन ऐतिहासिक विजय मिळवला. मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केले. मात्र, २५ जुलै याच दिवशी राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीचा शपथविधी का होतो. आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी याच दिवशी शपथ घेतली आहे. 

राष्ट्रपती म्हणजे, देशाचा पहिला नागरिक असतो. देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेतली आहे. देशाच्या सहाव्या राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ज्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्या सर्वांनी याच तारखेला पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर देशातील एकूण ८ राष्ट्रपतींनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. २४ जुलै रोजी राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळही पूर्ण झाला असून, २५ जुलै रोजी देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. 

‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध

इंदिया गांधी सरकारने देशात जेव्हा आणीबाणी लागू केली होती, त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी जनता पक्षाच्या माजी नेत्या नीलम संजीव रेड्डी यांनी विजय मिळवला होता. नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै, १९७७ रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर दर पाच वर्षांनी २५ जुलै रोजीच देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती शपथ घेतात. आतापर्यंत, नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर ज्ञानी जैल सिंह (२५ जुलै १९८२ ते २५ जुलै १९८७), रामास्वामी वेंकटरमन (२५ जुलै १९८७ ते २५ जुलै १९९२), शंकरदयाल शर्मा (२५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७), केआर नारायनन (२५ जुलै १९९७ ते २५ जुलै २००२), एपीजे अब्दुल कलाम (२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७), प्रतिभा पाटील (२५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२), प्रणब मुखर्जी (२५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७), रामनाथ कोविंद (२५ जुलै २०१७ ते २५ जुलै २०२२).

दरम्यान, ज्याचा जन्म स्वतंत्र भारतात झाला अशी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. स्वतंत्र भारताच्या नागरिकांसोबतच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला तेजी आणायला हवी. माझा जन्म ओडिशातील एका आदिवासी गावात झाला. परंतु लोकशाहीच्या ताकदीने मला इथवर पोहोचवले. एका महत्त्वपूर्ण कालखंडात देशाने माझी निवड राष्ट्रपती म्हणून केली आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करत आहोत. जेव्हा माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाली होती तेव्हा आपण स्वातंत्र्याची ५० व्या वर्षाचं पर्व साजरे करत होतो. आता ७५ वर्षे पूर्ण होताना मला नवी जबाबदारी मिळाली आहे, अशा भावना द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केल्या.
 

Web Title: droupadi murmu oath ceremony as president of india why is swearing in ceremony of president on july 25 know history and significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.