शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 18:52 IST

Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेशमधील चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागामध्ये चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेश सरकारने केलेल्या दाव्यानुसार भारताच्या सीमेमध्ये चीनकडून ड्रोन पाठवण्यात आले होते. एवढंच नाही तर चिनी विमानेही या भागात दिसली होती, असाही दावा करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशमधीलचीनच्या सीमेला लागून असलेल्या भागामध्ये चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेश सरकारने केलेल्या दाव्यानुसार भारताच्या सीमेमध्ये चीनकडून ड्रोन पाठवण्यात आले होते. एवढंच नाही तर चिनी विमानेही या भागात दिसली होती, असाही दावा करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री जगत सिंह नेगी यांनी या दाव्यांना दुजोरा दिला आहे. चीनकडून सीमाक्षेत्रामध्ये होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनामुळे चीनच्या हेतूंबाबत शंका उपस्थित झाली असून, ही माहिी समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या सीमेमध्ये चिनी ड्रोन आणि विमाने दिसून आल्याचा दावा करण्यात येत आहे. लष्कर, पोलीस आणि सर्वसामान्यांनीही भारताच्या सीमेमध्ये हे ड्रोन पाहिले. नंतर हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री जगत सिंह नेगी यांनीही या घटनेला दुजोरा दिला. या प्रकारानंतर सीमेजवळ राहणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.  

किन्नौर जिल्ह्यातील भारताच्या सीमेमध्ये या चिनी ड्रोननी घुसखोरी करून भारताच्या हवाई हद्दीचं उल्लंघन केलं. शिपकी ला बॉर्डक आणि पूह ब्लॉत हेडक्वार्टरसमोर ऋषी डोगरी येथेही ड्रोन दिसून आले.  ड्रोन पाठवून चीन सीमावर्ती भागामध्ये भारताकडून होत असलेली रस्तेबांधणी आणि इतर हालचालींची माहिती घेत असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत