फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 06:06 IST2025-07-12T06:06:17+5:302025-07-12T06:06:46+5:30

एनएचएआयने टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आणि वाहनचालकांना अशा लूज फास्टॅगची माहिती लगेच देण्यास सांगितले आहे.

Drivers will be blacklisted if they do not apply FASTag properly; Do you also make this mistake while driving? | फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?

फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?

नवी दिल्ली - गाडीच्या समोरील (विंडस्क्रीन) काचेवर फास्टॅग व्यवस्थित न लावणाऱ्या चालकांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही कारवाई करणार असल्याची माहिती आहे.

‘लूज फास्टॅग’ म्हणजे असा फास्टॅग जो काचेला लावलेला नसतो, तर तो चालकाजवळ हातात असतो किंवा गाडीत इतरत्र ठेवलेला असतो. अशामुळे टोल वसुलीत अडथळा निर्माण होतो. यामुळे टोल प्लाझावर गर्दी वाढते, तांत्रिक अडचणी निर्माण होतात आणि इतर वाहनचालकांनाही त्रास होतो, यामुळे एनएचएआयने हे पाऊल उचलले आहे. 

एनएचएआयने टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आणि वाहनचालकांना अशा लूज फास्टॅगची माहिती लगेच देण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीवरून संबंधित फास्टॅग तत्काळ ब्लॅकलिस्ट केले जातील, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

Web Title: Drivers will be blacklisted if they do not apply FASTag properly; Do you also make this mistake while driving?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.