चालकाच्या समय सूचकतेमुळे टळला मोठा अपघात, टोल प्लाझावरील व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:49 IST2021-08-29T17:48:27+5:302021-08-29T17:49:32+5:30
Viral Video: ब्रेक फेल झालेल्या ट्रकवर नियंत्रण मिळवत चालकाने मोठा अपघात टाळला.

चालकाच्या समय सूचकतेमुळे टळला मोठा अपघात, टोल प्लाझावरील व्हिडिओ व्हायरल
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील एका टोल प्लाझावर मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. या घटनेची एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आली आहे. या फुटेजनुसार, एक ब्रेक फेल झालेला भरधाव ट्रक टोल प्लाझावर कोसळल्याचे दिसत आहे. पण, वाहन चालकाने ट्रकवर नियंत्रण मिळवून एक मोठा अपघात होण्यापासून वाचवला.
दादरी लुहारली टोल प्लाजा पर ट्रक के ब्रेक फेल होने के बाद ट्रक चालक की सूझबूझ से बड़ा हादसा होने से टला,ट्रक को डिवाइडर से ले जाते हुए टोल बूथ के सेंसर को तोड़ते हुए कैमरे में हुआ कैद pic.twitter.com/Vm3DdQoAS7
— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) August 29, 2021
एनडीटीव्हीने याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक ट्रक टोल प्लाझाच्या दिशेने अनियंत्रितपणे येत आहे. यावेळी टोल प्लाझावर दोन कारही दिसत आहेत, पण ट्रक चालक समय सुचकता दाखवून ट्रकला टोल बूथच्या कोपऱ्यावर असलेल्या एका लहान रस्त्यावर नेतो. या लहान रस्त्यावर नेताच ट्रकचा वेग कमी होतो आणि एक मोठा अपघात टळतो.