अहमदाबादमध्ये फ्लॅटमध्ये सापडले ९५ किलो सोने अन् रोकड! छापा टाकणारे अधिकारीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:40 IST2025-03-18T14:37:53+5:302025-03-18T14:40:49+5:30

गुजरातमध्ये एका बंद खोलीत टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ९५ किलोहून अधिक सोनं सापडलं आहे.

DRI and ATS found 100 kg gold in closed flat in Ahmedabad | अहमदाबादमध्ये फ्लॅटमध्ये सापडले ९५ किलो सोने अन् रोकड! छापा टाकणारे अधिकारीही चक्रावले

अहमदाबादमध्ये फ्लॅटमध्ये सापडले ९५ किलो सोने अन् रोकड! छापा टाकणारे अधिकारीही चक्रावले

Ahmedabad Raid:गुजरातच्याअहमदाबादमध्ये एका बंद खोलीत मोठं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. अहमदाबादमधील एका बंद फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात ९५ किलोहून अधिक सोने आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम बंद खोलीत सापडल्याने कारवाईसाठी आलेले अधिकारीही चक्रावून गेले. जप्त करण्यात आलेले सोने आणि रोख रकमेची एकूण किंमत सुमारे ९० कोटी रुपये आहे.

महसूल गुप्तचर संचालनालय आणि दहशतवाद विरोधी पथकाने अहमदाबाद शहरातील पालडी भागातील स्टॉक मार्केट ऑपरेटरच्या रिकाम्या फ्लॅटवर ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात पथकाला स्टॉक ब्रोकरच्या बंद फ्लॅटमधून ९५ किलो सोने, मोठ्या प्रमाणात दागिने आणि बरीच रोकड जप्त करण्यात आली आहे. तपास यंत्रणा आणि पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. २५ अधिकाऱ्यांनी सोमवारीदुपारी शेअर मार्केट ऑपरेटरच्या पालडी येथील आविष्कार अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०४ वर छापा टाकला. या फ्लॅटचे मालक महेंद्र शहा आणि मेघ शहा नावाच्या व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. तपास अधिकाऱ्यांना फ्लॅटमध्ये एक बंद बॉक्स सापडला होता. तो उघडल्यावर छापा टाकण्यासाठी आलेले अधिकारीही थक्क झाले. मोठ्या प्रमाणावर सोने सापडल्यानंतर त्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने कोठून आले याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

छाप्यादरम्यान नोटा मोजण्यासाठी दोन मशीन आणि सोन्याचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रिक स्केलही जप्त करण्यात आले आहेत. तपासात सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आल्याचे उघड झाले असून, त्याचे एकूण वजन ९५.५ किलो आहे. याशिवाय काही दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय छाप्यात सुमारे ६० ते ७० लाख रुपयांची रोकड सापडली आहे.
 

Web Title: DRI and ATS found 100 kg gold in closed flat in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.