राजा रघुवंशीच्या घरी भलताच ड्रामा, छोट्या मुलाला घेऊन आली मोठ्या भावाची प्रेयसी, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:21 IST2025-08-05T17:19:01+5:302025-08-05T17:21:57+5:30
Raja Raghuvanshi Family News: हनिमूनला गेला असताना हत्या झालेल्या राजा रघुवंशी याचं कुटुंब सध्या वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आज राजा रघुवंशीचा मोठा भाऊ सचिन रघुवंशी याची कथित प्रेयसी एका मुलाला घेऊन रघुवंशी कुटुंबीयांच्या दारात आली.

राजा रघुवंशीच्या घरी भलताच ड्रामा, छोट्या मुलाला घेऊन आली मोठ्या भावाची प्रेयसी, त्यानंतर...
इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरण देशभरात गाजलं होतं. हनिमूलना गेला असताना मेघालयमध्ये राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिला अटक करण्यात आली होती. दरम्यान, सध्या राजा रघुवंशी याचं कुटुंब वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आज राजा रघुवंशीचा मोठा भाऊ सचिन रघुवंशी याची कथित प्रेयसी एका मुलाला घेऊन रघुवंशी कुटुंबीयांच्या दारात आली. तिला पाहताच राजा रघुवंशी याचा भाऊ सचिन हा कार घेऊन तिथून पसार झाला. या महिलेने काही दिवसांपूर्वीच या मुलाची डीएनए चाचणी केली होती. तसेच हे मूल राजा रघुवंशी याचा मोठा भाऊ सचिन रघुवंशी याचं असल्याचा दावा तिने केला होता.
या महिलेने सचिन रघुवंशीसोबतच्या संबंधांबाबत दावा करताना सांगितले की, आमचं दोघांचं मंदिरात लग्न झालं होतं. या लग्नाचे फोटोही माझ्याकडे आहेत. माझ्याकडे राहायला घर नाही आहे. त्यामुळे मला सचिनच्या घरात आश्रय हवा आहे, अशी मागणी ही महिला करत आहे. एवढंच नाही तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ठिय्या देऊन आंदोलन करत राहीन असा इशाराही या महिलेने दिले आहे. दरम्यान, जेव्हा ही महिला दारात आली तेव्हा सचिन रघुवंशीच्या आईने घराच्या गेटला कुलूप लावून दरवाजा बंद करून ठेवला.
ही महिला गेल्या शुक्रवारी पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर आली होती. तेव्हा तिने आपण सचिन रघुवंशीची पत्नी असल्याचा दावा केला होता. तसेच आपल्यासोबत असलेला मुलगा हा सचिन रघुवंशी याचा असून, त्याचा डीएनए अहवाल सचिनसोबत जुळला असल्याचा दावाही तिने केला होता. तसेच रघुवंशी कुटुंबीय माझ्या मुलाला जाणीवपूर्वक नाकारत आहेत. तसेच हा केवळ माझाच नाही तर माझ्या मुलाचाही अपमान आहे, असा आरोप तिने केला होता.