'ड्रॅगन का प्यारा खान', RSS च्या मुखपत्रातून आमीरवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 01:11 PM2020-08-26T13:11:47+5:302020-08-26T13:12:56+5:30

या फोटोंमुळे सोशल मीडियावर आमिर खान ट्रोल झाला. कारण, जम्मू-काश्मिरमधून कलम 370 रद्द करण्यात आले आहे. हे कलम हटवल्याचा विरोध करणाऱ्या देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे.

'Dragon Ka Pyara Khan', targets Aamir from RSS mouthpiece after visit turkey | 'ड्रॅगन का प्यारा खान', RSS च्या मुखपत्रातून आमीरवर निशाणा 

'ड्रॅगन का प्यारा खान', RSS च्या मुखपत्रातून आमीरवर निशाणा 

Next
ठळक मुद्देया फोटोंमुळे सोशल मीडियावर आमिर खान ट्रोल झाला. कारण, जम्मू-काश्मिरमधून कलम 370 रद्द करण्यात आले आहे. हे कलम हटवल्याचा विरोध करणाऱ्या देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे. आता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य या वृत्तपत्रात 'ड्रॅगन का प्यार

मुंबई - आपल्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान तुर्कीमध्ये गेला असून आपल्या आगामी चित्रपटाचे तो तिथे शुटिंग करणार आहे. तुर्कीतून त्याचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले आहेत. तो तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगनसोबत या फोटोंमध्ये दिसून आला आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट या फोटोवरून सोशल मीडियावर प्रचंड चांगलाच ट्रोल झाला होता. त्यानंतर, आता आरएसएसच्या मुखपत्रातून आमीर खानला लक्ष्य करण्यात आलंय.

या फोटोंमुळे सोशल मीडियावर आमिर खान ट्रोल झाला. कारण, जम्मू-काश्मिरमधून कलम 370 रद्द करण्यात आले आहे. हे कलम हटवल्याचा विरोध करणाऱ्या देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे. आता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य या वृत्तपत्रात 'ड्रॅगन का प्यारा खान' या मथळ्याखाली लेख लिहिला आहे. त्यामध्ये, आमीरला चीनी वस्तूंची जाहिरात आणि तुर्की भेटीवरुन टार्गेट करण्यात आलंय. आमीरचे नाव न घेता, प्रथम धर्म आणि नंतर देश अशी जिहादी विचारसरणी काही कलााकर ठेवताना दिसत आहे. शत्रुराष्ट्राच्या काही पैशांसाठी त्यांच्या तालावर नाचत आहेत, शत्रुराष्ट्राचा पाहुणचार निर्लज्जपणे स्विकारत आहेत? मग देशातील नागरिकांना वाईट का वाटू नये. म्हणूनच, आजकाल चीन आणि तुर्कीचे चाहते बनलेले आमीर खान त्यांच्या चाहत्यांकडून आणि देशभक्त नागरिकांकडून ट्रोल होत आहेत, असे पांचजन्य या मुखपत्रात म्हटले आहे. 

एकीकडे अक्षय कुमार, अजय देवगण, जॉन अब्राहम आणि कंगना रनौतसह इतरही कलाकार देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमावर आधारित चित्रपट बनवून देशाप्रति आपली निष्ठा सिद्ध करत आहेत. तर दुसरीकडे भारताच्या शत्रुराष्ट्रासोबत दोस्ती करताना आमीर खान यांना काहीच वाटत नाही. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आमीर खान तुर्कीच्या राष्ट्रपतींचा पाहुणचार स्विकारताना नतमस्तक झाल्याचं दिसून आलं, असं म्हणत पांचजन्य मुखपत्रातून आमीरला टार्गेट करण्यात आलंय. 

तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीचे ट्विट

एमीन एद्रोगनने आपल्या ट्विटर हँडलवर आमिर खानसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यांनी फोटो शेअर करताना लिहिले आहे की, जगप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांना भेटण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. फिल्ममेकर आणि दिग्दर्शक इस्तानबुलमध्ये आहेत. हे जाणून घेऊन मला आनंद होत आहे की, आमिर लवकरच आपला आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'चे शुटिंग तुर्कीतील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण करतील.

तुर्कीने जम्मू-काश्मिरमधील कलम 370 हटवल्यानंतर या निर्णयाचा विरोध केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हागिया सोफिया म्युझियनला पुन्हा मशीद बनवण्याच्या मुद्द्यावरून तुर्कीने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. आमिर खानने एमीन अर्दोआन ज्यांची भेट घेतली, त्या नेहमी हिजाब घालतात. परंतु, तुर्कीमध्ये हिजाबवर बंदी होती. हिजाब घालून मुली युनिवर्सिटीत जाऊ शकत नव्हत्या. परंतु, अर्दोआन यांच्या पत्नी हिजाबमुळेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हत्या. काही लोक आमिरला या कारणामुळेही ट्रोल करत आहेत. भारतात असहिष्णुता असल्याच्या आपल्या जुन्या वक्तव्यामुळेही आमिर खान ट्रोल होत आहे. तसेच पीकेमध्ये हिंदु धर्माची चेष्ठा केल्याचाही आमिरवर आरोप लावण्यात आला आहे.

लालसिंग चड्ढा

आमिर खान लवकरच हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे, ज्याचे नाव 'लाल सिंग चड्ढा’ आहे. ज्यात करीना कपूर आणि मोना सिंग महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. अतुल कुलकर्णी लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित या सिनेमात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आमिरने भारतातून शूटिंगसाठी तुर्कीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग भारतात सुमारे 100 ठिकाणी होणार होते, परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे शूटिंगवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता आणि मध्यभागी शूटिंग थांबवावे लागले. सिनेमाचे अखेरचे शूटिंग पंजाबमध्ये केले गेले. आतापर्यंत सिनेमाचे शूटिंग कोलकाता, दिल्ली, राजस्थान, चंदीगड आणि अमृतसर यासारख्या ठिकाणी झाले आहे.
 

Web Title: 'Dragon Ka Pyara Khan', targets Aamir from RSS mouthpiece after visit turkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.