डॉ.रमाकांत पाटील यांना कारची धडक
By admin | Updated: December 25, 2015 23:57 IST
जळगाव: येथील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रमाकांत पाटील यांना शुक्रवारी रात्री आठ वाजता धावत्या कारने मागून जोरदार धडक दिली. यात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने ते जागेवरच बेशुध्द पडले. त्यांना तातडीने सहयोग क्रिटीकल सेंटरला दाखल करण्यात आले. पाटील हे त्यांच्या नुतन मराठा महाविद्यालयासमोरुन दवाखान्यातून बाहेर पडले. रस्त्यावर आले असता मागून येणार्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. कारचालक लागलीच तेथून पसार झाला. या अपघातात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने बेशुध्द पडले. दवाखान्यातील सहकार्यांनी त्यांना सहयोग क्रिटीकलमध्ये दाखल केले. रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला कोणतीच नोंद झालेली नव्हती.