शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही आमची फी सीमेवरच भरले", 'या' डॉक्टरांचे सैनिकांशी अतुट नाते; 25 वर्षांपासून देतात मोफत उपचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 19:09 IST

Doctor Brijpal Tyagi: सैन्यात भरती होऊ न शकलेल्या डॉक्टरांनी सैनिकांवर मोफत उपचार करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 

गाझियाबाद : देशप्रेमाची भावना आणि सेवेची तळमळ हे दोन्ही गुण गाझियाबादच्या डॉ. ब्रिजपाल त्यागी यांच्यामध्ये आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांना लहानपणापासूनच सैनिकांच्या वर्दीचे आकर्षण होते. खरं तर देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि निवडही झाली. पण 1989 मध्ये त्यांची परिस्थिती अशी बनली की ते सैन्यात भरती होऊ शकले नाहीत. पुढे घरच्यांच्या दबावामुळे ते डॉक्टर झाले. मात्र, डॉक्टर झाल्यानंतरही त्यांनी सैनिकांप्रती जिव्हाळ्याचे नाते ठेवले आहे. लक्षणीय बाब म्हणजे ते मागील 25 वर्षांपासून सैनिकांवर मोफत उपचार करत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी आपला झेंडा रोवला आहे. या क्षेत्रात त्यांना येऊन जवळपास 26 वर्षे उलटली आहेत. या वर्षांत डॉ.ब्रिजपाल यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. नॉनस्टॉप शेकडो कानांवर मोफत ऑपरेशन करून त्यांनी 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंदवले आहे. एवढेच नाही तर वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.बी.पी.त्यागी यांना ब्रिटिश संसद-हाऊस ऑफ कॉमन्समध्येही सन्मानित करण्यात आले आहे. 2017 मध्ये त्यांना टाइम्स अचिव्हर्स अवॉर्ड देखील मिळाला होता.

सैनिकांची सेवा करण्याचा ध्यासगाझियाबादमधील आरडीसी येथील डॉ. बीपी त्यागी यांच्या क्लिनिकच्या बाहेरील गेटवर एक नोटीस लावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये सैनिकांवर मोफत उपचार केले जातील असे म्हटले आहे. "तुम्ही आमची फी सीमेवरच भरली आहे, आता तुम्हाला कोणतीही फी भरण्याची गरज नाही," असे या नोटीसमध्ये लिहण्यात आले आहे. त्यांनी जवानांप्रती असलेल्या प्रेमामुळे ही मोहिम राबवली आहे. डॉ.बी.पी.त्यागी हे देशातील सैनिकांवर मोफत उपचार करतात. असे केल्याने एक समाधान मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक जवानांनीही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. बीपी त्यागी म्हणतात की मी सैन्यात भरती होऊ शकलो नाही. पण मला वैद्यकीय क्षेत्रातूनच या सैनिकांशी जवळीक साधायची आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

  

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीIndian Armyभारतीय जवान