शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

जेट एअरवेज आणि किंगफिशरला एअरलाईन्सला वेगळा न्याय का? माल्ल्याचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 07:22 IST

जेट एअरवेजला मदत करताय, मग किंगफिशर एअरलाईन्सला का केली नाही; माल्ल्याचा एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप

नवी दिल्ली: जेट एअरवेजला मदत करणाऱ्या सरकारनं किंगफिशर एअरलाईन्सला का मदत केली नाही, असा सवाल उद्योगपती विजय माल्ल्यानं उपस्थित केला आहे. जेट एअरवेज अडचणीत असताना सरकारी बँका मदतीला धावल्या आहेत. हे चित्र पाहून छान वाटतं. मात्र हीच मदत किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत असताना का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारत माल्ल्यानं एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. माल्ल्यानं ट्विटरवरुन जेट प्रकरणावर भाष्य केलं आहे. विजय माल्ल्यानं चार ट्विट करत जेट एअरवेज आणि किंगफिशर एअरलाईन्सला वेगळा न्याय का, असा प्रश्न विचारला. 'जेट एअरवेज वाचवण्यासाठी सरकारी बँकांकडून मदत केली जात आहे. रोजगार वाचावेत यासाठी बँकांची धडपड सुरू आहे. किंगफिशर एअरलाईन्सच्या बाबतीतही हेच व्हायला हवं होतं,' असं माल्ल्यानं ट्विटमध्ये म्हटलं. त्यानं यावरुन भाजपा सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. 'भाजपाचे प्रवक्ते मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेली पत्रं वाचून दाखवतात. यूपीए सरकारच्या काळात सरकारी बँका यूपीएच्या दबावाखाली होत्या, असा आरोप करतात. सध्याच्या पंतप्रधानांना पत्र लिहिल्यावर माध्यमं माझ्यावर टीका करतात. त्यामुळे एनडीए सरकारच्या काळात नेमकं काय बदललं, असा प्रश्न मला पडतो,' अशा शब्दांमध्ये माल्ल्यानं सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 

किंगफिशर एअरलाईन्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र तरीही मला मदत करण्याऐवजी टीकाच करण्यात आली, असं माल्ल्यानं पुढील ट्विटमध्ये म्हटलं. 'किंगफिशर एअरलाईन्स वाचवण्यासाठी मी 4 हजार कोटी कंपनीत गुंतवले. मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही. उलट माझ्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. देशातील सर्वोत्तम विमान कंपनीला (किंगफिशर एअरलाईन्सला) सरकारी बँकांनी मदत केली नाही. हा एनडीए सरकारचा दुटप्पीपणा आहे,' असा आरोप माल्ल्यानं केला. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास मी तयार होतो, याची आठवण करुन देण्याचा प्रयत्नदेखील माल्ल्यानं केला. 'मी कर्नाटक उच्च न्यायालयाला माझ्या संपत्तीचा, मालमत्तेचा तपशील दिला होता, याची पुन्हा एकदा आठवण करुन द्यावीशी वाटते. बँका आणि देणेकऱ्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मी हे पाऊल उचललं होतं. मग बँकांनी मी देत असलेली रक्कम का घेतली नाही?', असा प्रश्न माल्ल्यानं विचारला आहे.  

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याNarendra Modiनरेंद्र मोदीJet Airwaysजेट एअरवेजManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपा