शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आंध्रात ‘मनोरंजनाचा डबल धमाका’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:34 AM

शेती, बेरोजगारी, भाववाढ हे मुद्दे बनणार प्रचाराचे केंद्रबिंदू

- समीर इनामदारलोकसभेच्या निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने यावर्षी आंध्र प्रदेशात मनोरंजनाचा डबल धमाका अनुभवास मिळणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मतदारांची नावे गायब होण्याबरोबरच ‘डाटा’ चोरीच्या तक्रारीपासून याची सुरुवात झाली आहे.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आंध्र प्रदेशातील २५ लोकसभा आणि १७५ विधानसभांच्या जागांवर निवडणूक होणार असल्याची घोषणा केली. आंध्र प्रदेशात पहिल्याच टप्प्यामध्ये एकाच वेळी म्हणजे ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आंध्र प्रदेश विधानसभेचा कालावधी एप्रिल आणि मे दरम्यान पूर्ण होत आहे. शेती, बेरोजगारी, भाववाढ हे आंध्र प्रदेशातील मुख्य मुद्दे आहेत.तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात यावर्षी जोरदार टक्कर होण्याची चिन्हे आहेत. १५ व्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आंध्र प्रदेशात हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५ जागा आहेत. ९९ जागांसह तेलुगू देसम पक्ष सध्या सत्तेत आहे. २०१४ साली तेलंगणा या वेगळ्या राज्याची घोषणा झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू हे नव्या आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. अर्थात यापूर्वी त्यांनी १९९४ ते २००४ इतक्या वर्षांपर्यंत राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहेत. आंध्र प्रदेशात सर्वाधिक काळ राहणारे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबूंची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्ष आणि काँग्रेस यांची युती होती. मात्र या युतीला मोठा फटका बसल्याने आंध्र प्रदेश निवडणुकीत ‘काँग्रेसने एकला चलो रे’चा नारा दिला आहे. विधानसभेच्या १७५ आणि लोकसभेच्या २५ जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते ओमान चंडी यांनी केली होती.जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला विधानसभेत ६६ जागा मिळाल्या आहेत. गेल्या १४ महिन्यांत जगनमोहन यांनी ३,६४८ कि. मी. पदयात्रा काढली होती. ‘निन्नू नम्मम बाबू’ अर्थात आमचा तुमच्यावर विश्वास नाही, बाबू अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.सिनेअभिनेते पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टीनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भाजपचीही स्थिती फारशी चांगली नाही. २०१४ साली आंध्र प्रदेशात लोकसभेच्या ४२ जागा होत्या. त्यातील तेलुगू देसम पक्षाने १६, तेलंगणा राष्टÑ समितीने ११, वायएसआर काँग्रेसने ९, भाजपने तीन आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या.मतदारांची माहिती चोरल्याप्रकरणी आंध्र प्रदेशात सध्या घमासान माजले आहे. आंध्र प्रदेश सरकारचा ‘डाटा’ चोरीस गेल्याप्रकरणी व्हिसल ब्लोअरने आरोप केला होता की, आयटी ग्रीड्स (इंडिया) प्रा. लि. या कंपनीकडे ३.७ कोटी मतदारांचे आधार कार्ड क्रमांक, मोबाईल फोन क्रमांक, रेशन कार्डबाबत अवैधरित्या माहिती उपलब्ध आहे. याबाबत सर्वच पक्षांनी एकमेकांविरुद्ध आरोप केले होते.लाखो मतदारांची नावे गायबया निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीतून गायब आहेत. ज्यांची नावे मतदार यादीतून गायब आहेत त्यांनी फॉर्म ७ भरून द्यायचा होता. ७,२४,९१४ जणांनी हा फॉर्म भरून दिला. त्यापैकी ५,२५,९५७ जणांच्या तक्रारी फेटाळण्यात आल्या तर १,५८,१२४ जणांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. भाजप आणि वायएसआर काँग्रेसने याबाबत तक्रारी केल्या होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAndhra Pradeshआंध्र प्रदेश