शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टातील विजयानंतर ED समोर दुहेरी आव्हाने, २० वर्षांत केवळ २३ जणांना शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:21 IST

२० वर्षांत केवळ २३ जणांना शिक्षा : कर्मचाऱ्यांच्या ४० टक्के कमतरतेसह हजारो प्रकरणे सोडवणे

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याची वैधता सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) पीएमएलए व फेमा अंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. ईडीला मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. २०२०च्या अहवालानुसार, ईडीला ४० टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. स्वतंत्र निरीक्षकांचे म्हणणे आहे की, संशयितांना समन्स बजावल्यानंतर छापे मारणे व मालमत्ता जप्त करणे, यानंतर शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच निराशाजनक आहे.

लोकसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरानुसार, कठोर फेरा असे म्हटले गेलेला २००२मध्ये हा पीएमएलए कायदा अस्तित्वात आल्यानंतर आजवर केवळ २३ प्रकरणांत शिक्षा करण्यात आली. योगायोगाने पी. चिदंबरम यांनी २०१२ मध्ये अर्थमंत्री असताना ज्या पीएमएलएचे जोरदारपणे समर्थन केले होते, त्यांना व त्यांचे पुत्र खा. कार्ती चिदंबरम यांना ईडीच्या तडाख्याला सामोरे जावे लागत आहे. चिदंबरम यांच्याशिवाय ईडी मोठ्या संख्येने हाय प्रोफाईल प्रकरणांची चौकशी करीत असून, यात अनेक विद्यमान व माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार व भारतभरातील व्यावसायिक घराण्यांचा समावेश आहे.यातील अनेक प्रकरणांत तपास जवळजवळ थांबला आहे; कारण सुप्रीम कोर्टात अटकेचे अधिकार, झडती व जप्तीबाबत अनेक तरतुदींना आव्हान देणाऱ्या २०० हून अधिक याचिका दाखल झालेल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय.

प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढावीआता सुप्रीम कोर्टाकडून निरंकुश अधिकार मिळाल्यानंतर ईडीला सर्व प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही. ईडीला एकूण २,०६४ कर्मचारी मंजूर आहे. अधिकृतपणे ईडीचे म्हणणे आहे की, ३०,७१६ प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे व १५,४९५ प्रकरणे निकाली काढली आहेत. तरीही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, हे त्यातूनसमोर येते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस