सुट्टीवर आलेल्या भारतीय कामगारांना दुहेरी फटका; अमेरिकेसाठीच्या विमानभाड्यात प्रचंड वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 08:37 IST2025-09-21T08:37:18+5:302025-09-21T08:37:49+5:30
सध्या सुट्टीवर किंवा भारतात व्यावसायिक दौऱ्यावर असलेले व्हिसाधारक मात्र पूर्णपणे अडचणीत आले आहेत.

सुट्टीवर आलेल्या भारतीय कामगारांना दुहेरी फटका; अमेरिकेसाठीच्या विमानभाड्यात प्रचंड वाढ
नवी दिल्ली : अमेरिकेने एच-१बी व्हिसासाठीची फी थेट १ लाख डॉलर्स इतकी करण्याचा आणि ती २१ सप्टेंबरपासूनच लागू करण्याचा अचानक निर्णय घेतल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. नवरात्रातील दुर्गापूजेसाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार भारतात परतण्याचा काळ असतानाच हा निर्णय लागू झाल्याने उड्डाण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यामुळे काही तासांतच नवी दिल्ली ते न्यूयॉर्कच्या प्रवासाचे एकमार्गी भाडे ३७ हजार रुपयांवरून थेट ७०-८० हजार रुपयांवर गेले. काही प्रवाशांनी तर ४,५०० डॉलर्स (सुमारे ३.७ लाख) इतके भाडे मोजल्याचे सोशल मीडियावर नमूद केले.
भारतात आलेले व्हिसाधारक अडचणीत
सध्या सुट्टीवर किंवा भारतात व्यावसायिक दौऱ्यावर असलेले व्हिसाधारक मात्र पूर्णपणे अडचणीत आले आहेत. अमेरिकन इमिग्रेशन वकील सायरस मेहता यांनी सांगितले, “जे एच-१बी व्हिसाधारक अमेरिकेबाहेर सुट्टीवर किंवा व्यवसाय दौऱ्यावर आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ फारच कठीण आहे.