शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 9:51 PM

मोदींना पराभूत करायचं असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली: बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष या उत्तर प्रदेशातील पक्षांनंतर आता दिल्लीतल्या आम आदमी पक्षानं काँग्रेसला धक्का दिला आहे. नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिल्लीतील एका भाषणात म्हटलं. याआधी बहुजन पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसपासून चार हात लांब राहण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान कोणही होऊ दे. दिल्लीत आम आदमी पक्षाचेच खासदार निवडून द्या, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं. 'चार वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी जनतेनं दिल्लीतून भाजपाच्या 7 उमेदवारांना विजयी केलं. मात्र त्यानंतर वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं 67 जागा देऊन आमचं सरकार स्थापन केलं. आता जास्त काम कोणी केलं? भाजपानं की आपनं? याचं उत्तर जनतेनं द्यावं,' असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीत आपचे 7 खासदार निवडून आले असते, तर कामांचा वेग दहापटींनी वाढला असता. आम्ही संसदेचं कामकाज ठप्प केलं असतं. मात्र मेट्रोच्या तिकीटाचा दर वाढू दिला नसता, असं केजरीवाल यांनी म्हटलं. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही चूक केली, असं अनेक दिल्लीकर सांगतात. आता आम आदमी पक्षालाच मतदान करु, अशी भावना अनेकजण बोलून दाखवतात. अनेकांना राहुल गांधींना मतदान करायचं नाही. पंतप्रधान कोणही होऊ दे. दिल्लीत आपचे खासदार निवडून यायला हवेत. दिल्लीत आप हाच पर्याय आहे,' असं त्यांनी म्हटलं. ज्यांना मोदींना हरवायचं आहे, त्यांनी काँग्रेसला मतदान करु नये. भाजपाचा पराभव करायचा असल्यास आपला मत द्या, असं आवाहन केजरीवालांनी केलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसAAPआपNew Delhiनवी दिल्लीdelhiदिल्लीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९