शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याकडून चूक झाली, मोदींवर रागावू नका...'; केंद्रीय मंत्र्याने भरसभेत मागितली लोकांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 16:17 IST

BJP Parshottam Rupala : 'माझ्याकडून चूक झाली, तुमचा राग पंतप्रधान मोदींवर काढू नका,' असं म्हणत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने क्षत्रिय समाजाची माफी मागितली.

Parshottam Rupala Controversy: गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. ७ मे रोजी गुजरामध्ये २६ जागांवर मतदान होणार आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय तर दुसरीकडे क्षत्रिय समाजाचा मुद्दा देखील तापला आहे. अशातच केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी पुन्हा एकदा क्षत्रिय समाजाची माफी मागितली आहे. भरसभेत रुपाला यांनी क्षत्रिय समाजाच्या लोकांकडे माफी मागितली.

गुजरातच्या राजकोट मतदारसंघातून पुरुशोत्तम रुपाला हे  भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. महिन्याभरापूर्वी रुपाला यांनी क्षत्रिय समाजाशी संबंधित वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे क्षत्रिय समाज संतप्त आहे. रुपालांच्या विरोधात क्षत्रिय समाजाने अनेक आंदोलने सुरु केली आहेत. रुपाला यांना पराभूत करण्यासाठी क्षत्रिय समाजाने धर्मरथ काढला आहे. तसेच क्षत्रिय समाज भाजपच्या विरोधात मतदान करण्यावर ठाम आहे. या सगळ्यात आता पुन्हा परशोत्तम रुपाला यांनी क्षत्रिय समाजाची माफी मागितली आहे. माझ्या चुकीची शिक्षा पंतप्रधान मोदी यांना देऊ नका असे रुपाला यांनी म्हटलं आहे.

शनिवारी जसदण येथील निवडणूक सभेत रुपाला बोलत होते. 'माझ्याकडून चूक झाली होती. मी जाहीर माफीही मागितली आहे. 'माझा हेतू चुकीचा नव्हता. मी क्षत्रिय समाजाचीही माफी मागितली आहे. त्यांच्याकडूनही मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण मग पंतप्रधान मोदींना विरोध का?,' असा सवाल पुरुषोत्तम रुपाला यांनी विचारला.

"भाजपच्या जडणघडणीत तुमचाही मोठा वाटा आहे. पंतप्रधान मोदी दिवसाचे 18 तास काम करतात आणि देशाचा विचार करत नाहीत. अनेक क्षत्रिय पंतप्रधान मोदींच्या विकास प्रवासात त्यांच्यासोबत आहेत. मग माझ्यामुळे त्यांचा विरोध का? मी माझी चूक मान्य करतो. पण क्षत्रिय समाजाला पंतप्रधान मोदींच्या विरोधात उभे करणे मला योग्य वाटत नाही. कृपया पंतप्रधानांविरोधात दाखवल्या जात असलेल्या संतापाचा पुन्हा विचार करा," असेही रुपाला म्हणाले.

नेमका वाद कशामुळे?

पुरुशोत्तम रुपाला हे पाटीदार समाजातील आहेत. ब्रिटीश राजवटीत  माजी क्षत्रिय राज्यकर्त्यांविरुद्ध त्यांनी केलेल्या कथित टिप्पणीनंतर समाज त्यांच्या विरोधात उभा राहिला आहे. 23 मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये रुपाला राजकोटमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दिसत होते. 'ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केले... त्यांनी आमचा छळ करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यावेळी राजे इंग्रजांपुढे नतमस्तक झाले. त्यांनी इंग्रजांशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यांनी आपल्या मुलींचे लग्नही त्यांच्याशी केले. पण आपल्या रुखी समाजाने ना आपला धर्म बदलला ना इंग्रजांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, तरीही त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार झाले, असे रुपाला यांनी म्हटलं. याच वक्तव्यावरुन क्षत्रिय समाज रुपाला यांच्याविरोधात संताप व्यक्त करत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४gujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस