परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:31 IST2025-09-19T15:28:29+5:302025-09-19T15:31:18+5:30

पंजाबमध्ये यूपी-बिहारींना मदत करणाऱ्यांवरही बहिष्कार टाकला जाईल अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे.

Don't rent houses to migrants, appeal made in various places in Punjab; Demand to evict UP-Bihari | परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

नवी दिल्ली - महाराष्ट्र, कर्नाटकानंतर आता पंजाबमध्येही परप्रांतीयांविरोधात स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील काही काळापासून मोठ्या संख्येने यूपी आणि बिहारमधील लोकांनी पंजाबमध्ये स्थलांतर केले. त्यातील काहींनी इथल्या संस्कृती, पंजाबी भाषा आणि शिख धर्माच्या प्रथा परंपरेची जुळवून घेतले. परंतु आता या राज्यात यूपी बिहारींविरोधात स्थानिक नागरिकांनी आवाज उचलणे सुरू केले आहे. पंजाबमधील वाढत्या गुन्हेगारीमागे स्थलांतरितांचा हात असल्याचा सांगत इथल्या लोकांनी हे लोक पंजाबमधील वातावरण खराब करतायेत असा आरोप केला आहे. 

अलीकडेच ९ सप्टेंबर रोजी होशियारपूर येथे ५ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपी परप्रांतीय होता. त्यानंतर पंजाबमध्ये परप्रांतीयांविरोधात आक्रोश दिसून येत आहे. यूपी-बिहारींना राज्यातून बाहेर काढा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पंजाबच्या अनेक गावात ग्रामपंचायतीने प्रस्ताव पारित करून यूपी-बिहारींना भाड्याने घरे देऊ नका असं म्हटले आहे. त्याशिवाय या नागरिकांना रेशन कार्ड, मतदार कार्डही बनवू नये अशी मागणी केली आहे. होशियारपूरच्या या घटनेनंतर पंजाबच्या अनेक शहरांमध्ये यूपी-बिहारींना हाकला, पंजाबला वाचवा असा नारा घुमू लागला आहे. 

गुरुद्वारामध्येही परप्रांतीयांविरोधात आवाहन केले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात यूपी बिहारी लोक पुन्हा त्यांच्या राज्यात परतत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड येथे स्थलांतरितांनी गर्दी केली आहे. पंजाबमध्ये यूपी-बिहारींना मदत करणाऱ्यांवरही बहिष्कार टाकला जाईल अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. पंजाबच्या गल्ली गल्लीमध्ये रिक्षामधून स्पीकरद्वारे लोकांना यूपी-बिहारींविरोधात आवाहन केले जात आहे. या लोकांना कुणी काम देऊ नका, भाड्याने घर देऊ नका अशी मोहिमच सुरू करण्यात आली आहे. 

सोशल मीडियावर अभियान

सध्या पंजाबच्या सर्व सोशल मीडियात यूपी-बिहारी यांच्याविरोधात मोहिम सुरू आहे. त्यात या लोकांना भाड्याने घरे देऊ नका असं आवाहन केले जात आहे. त्याशिवाय या लोकांना जमिनी विकू नका, त्यांना इथली ओळखपत्रे देऊ नका अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.  
 

Web Title: Don't rent houses to migrants, appeal made in various places in Punjab; Demand to evict UP-Bihari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.