शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका, उत्तर प्रदेशात फर्मान जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2017 10:55 AM

उत्तर प्रदेशात बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका असा आदेशच जारी करण्यात आला आहे

लखनऊ, दि. 2 -  उत्तर प्रदेशात बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका असा आदेशच जारी करण्यात आला आहे. पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य असलेले सुन्नी मौलाना रशीद फिरंगिमहली यांनी मुस्लिमांना हे आवाहन केलं आहे. मात्र यामागे कोणतंही धार्मिक कारण नसून राज्यात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला असल्याने पुर्वकाळजी म्हणून रशीद फिरंगिमहली यांनी हे आवाहन केलं आहे. स्वाईन फ्लूचं संकट दिवसेंदिवस वाढत असून, नमाजच्या निमित्ताने लोक एकत्र आल्याने तसंच गळाभेट घेतल्याने त्याचा फैलाव होण्याची भीती आहे असं रशीद फिरंगिमहली बोलले आहेत. 

दरम्यान शिया मौलाना जव्वाद यांनी गळाभेट घेताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे 66 रुग्ण आढळले आहेत. 

मौलाना रशीद फिरंगिमहली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, 'उत्तर प्रदेशमधील 20 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. यामधील अनेकजण नमाज पठन करतात आणि एकमेकांची गळाभेट घेत असतात. हात मिळवल्याने तसंच गळाभेट घेतल्याने स्वाईन फ्लूची लागण होण्याचा धोका असतो. यामुळे आम्ही आमच्या बांधवांना गळाभेट न घेता फक्त सलाम करा असं आवाहन केलं आहे. देवालाही आपल्या भक्तांची काळजी असते. जर एखाद्या सणामुळे स्वाईन फ्लूचा फैलाव झाला तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट असेल'. 

ईद-उल-अधा किंवा बकरी ईद हा मुस्लिमांचा सण आहे. या  दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरा केली जाते. इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे. या सणाला ‘ईद-उल-अज़हा’ किंवा ‘ईद-उज़-जुहा’ असेही म्हणतात. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे. 

बकरी ईदला जनावरं कापण्याऐवजी केक कापा, RSS प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचचं आवाहनदुसरीकडे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदला जनावरांच्या देण्यात येणा-या बळी प्रथेला विरोध करत बकरी ईदच्या दिवशी जनावरं नाही तर केक कापा, असे आवाहन मुस्लिमांना केले आहे. मुस्लिम उलेमा मात्र मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या या भूमिकेविरोधात उभी ठाकली आहे. 1400 वर्षांपासून बकरी ईदला जनावरांचा बळी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  शिवाय, धर्मामध्ये आरएसएस हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदच्या दिवशी जनावरांचा बळी देण्याला विरोध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Bakri Idबकरी ईदNamajनमाजMuslimमुस्लीम