‘निवडणूक लढू नकाे, ४० काेटी रुपये घे’; नेत्याच्या व्हिडीओवरून राजस्थानमध्ये वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 05:33 IST2023-10-20T05:32:47+5:302023-10-20T05:33:04+5:30
राजस्थान समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षा असलेल्या अर्चना शर्मा यांना काँग्रेसकडून मालवीयनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

‘निवडणूक लढू नकाे, ४० काेटी रुपये घे’; नेत्याच्या व्हिडीओवरून राजस्थानमध्ये वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : राजस्थानमधील काँग्रेस नेत्या अर्चना शर्मा यांच्या एका व्हिडीओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या व्हिडीओत मी निवडणूक न लढविण्यासाठी काँग्रेसमधीलच प्रतिस्पर्धी नेत्याने विरोधी पक्षासोबत ४० कोटी रुपयांची डील केल्याचे म्हटले आहे; परंतु त्यांनी या व्हिडीओमध्ये नेत्याचे नाव मात्र घेतलेले नाही.
राजस्थान समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षा असलेल्या अर्चना शर्मा यांना काँग्रेसकडून मालवीयनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या व्हिडीओवर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक राजीव अरोरा यांनी शर्मा यांच्यावर टीका केली. या व्हिडीओमुळे राजस्थान काँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले आहे.
‘मुख्यमंत्रिपद मला सोडणार नाही’
मला मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा आहे; परंतु हे मला सोडत नाही आणि भविष्यातही मला सोडणार नाही, असे अशोक गेहलोत म्हणाले; परंतु मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे गेहलोत म्हणाले.