शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांनी काढली तिसऱ्या आघाडीची हवा? शरद पवारांच्या 'पॉवरफुल' बैठकीआधी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 12:19 IST

दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी आज भाजप विरोधी पक्षांची बैठक; काँग्रेसकडून कोणीही उपस्थित राहणार नाही

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. शरद पवार यांनी गेल्या दोन आठवड्यांत दोनदा किशोर यांची भेट घेतली. यानंतर किशोर यांनी केलेलं विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; राऊतांनी सांगितलं शिवसेनेचं राज'कारण'

शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला काँग्रेस वगळता इतर भाजप विरोधी पक्ष सहभागी होत आहेत. यात तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभेच्या पुढील निवडणुकीत पवार तिसरी आघाडी तयार आहेत का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे. 'माझा तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल यावर माझा विश्वास नाही,' असं किशोर यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात काल दिल्लीत तीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यातील ही दुसरी बैठक होती. याआधी पवार आणि किशोर मुंबईत 'सिल्व्हर ओक'वर ११ जूनला भेटले होते. ती भेटदेखील बराच वेळ सुरू होती. काल प्रशांत किशोर यांची भेट घेणार शरद पवार आज विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मिशन २०२४ वर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेस