शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

इंदौरमध्ये दूषित पाण्याने मृत्यूतांडव; प्रश्न विचारल्यावर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:10 IST

Indore Water Contamination Deaths: दूषित पाण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर मंत्री कैलाश विजयवर्गीय भडकल्याचे पाहायला मिळाले.

Indore Water Contamination: देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदौरमध्ये दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या गंभीर मुद्द्यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी जाहीरपणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली, ज्यामुळे अखेर विजयवर्गीय यांना माफी मागावी लागली आहे.

बुधवारी रात्री कैलाश विजयवर्गीय त्यांच्या इंदौर-१ विधानसभा मतदारसंघातील भागीरथपुरा भागात परिस्थितीचा आढावा घेत होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंबाबत आणि रुग्णालयांच्या बिलांचा परतावा न मिळाल्याबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर विजयवर्गीय यांचा संयम सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच पत्रकाराला "नॉनसेन्स प्रश्न विचारू नकोस, तू काय ****** होऊन आला आहेस का?" अशा शब्दांत अपमानित केले.

मृतांच्या आकड्यावरून गोंधळ

भागीरथपुरा भागात ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळल्यामुळे कॉलरा आणि डायरियाचा प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडा ७ असला तरी, स्थानिक अहवालानुसार १० ते १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या २१२ हून अधिक लोक रुग्णालयात उपचार घेत असून ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली असून मोफत उपचारांचे आदेश दिले आहेत.

वाढत्या दबावानंतर माफीनामा

विजयवर्गीय यांच्या अभद्र भाषेमुळे पत्रकार संघटना आणि विरोधक आक्रमक झाले. चहुबाजूंनी टीका झाल्यावर त्यांनी एक्सवर पोस्ट लिहीत माफी मागितली. "गेल्या दोन दिवसांपासून आम्ही न झोपता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या माणसांना गमावल्याच्या दुखात माझ्याकडून चुकीचे शब्द निघून गेले, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो," असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचा जोरदार प्रहार

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांनी या घटनेवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. "भाजप नेत्यांचा अहंकार सातव्या अस्मानावर आहे. जनतेचा मृत्यू होत असताना मंत्री जबाबदारी झटकून शिवीगाळ करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा अभद्र मंत्र्याचा तातडीने राजीनामा घ्यावा," अशी मागणी पटवारी यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indore Water Crisis: Minister's Abuse Sparks Outrage After Deaths

Web Summary : Indore faces a deadly water crisis. Minister Kailash Vijayvargiya verbally abused a journalist questioning deaths, sparking outrage. Facing criticism, he apologized. Official reports say 7 died, but local reports claim more. Congress demands his resignation.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूWaterपाणी