मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावले आहेत. २४ टक्क्यांपासून सुरू केलेले कर आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा जपान दौरा पूर्ण झाला असून आता ते एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर
ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफ दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान आणि चीन दौरा होत आहे. मोठ्या प्रमाणात टॅरिफमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्यासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो असे मानले जाते.
एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी चीनला पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीवर जगाचे लक्ष आहे. पंतप्रधान मोदी ७ वर्षांनंतर चीनच्या दौऱ्यावर आहेत.
जपान भेटीमुळे दोन्ही देशातील संबंध मजबूत झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचा दोन दिवसांचा जपान दौरा पूर्ण केला. दोन दिवसांच्या जपान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांचे समकक्ष शिगेरू इशिबा यांच्याशी शिखर वार्तालाप केला. यादरम्यान, दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींच्या या भेटीदरम्यान, भारत आणि जपानमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. पण, अनेक अमेरिकन दिग्गजांनी त्यांच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.
प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड वुल्फ यांनी ट्रम्प यांचा निर्णय चूक ठरेल असा इशारा दिला आहे. 'जागतिक आर्थिक व्यवस्थेत मोठा बदल होत आहे आणि अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने हे दिसून येते की सत्तेचे संतुलन आता अमेरिकेकडून ब्रिक्स देशांकडे सरकत आहे. अमेरिकेचे टॅरिफ धोरण ब्रिक्सना मजबूत आणि एकजूट बनवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.