शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Donald Trump's India Visit : 'भारत आपली वाट पाहतोय...', नरेंद्र मोदींकडून रिट्विट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 9:52 AM

Donald Trump's India Visit : 'लवकरच आपली अहमदाबादमध्ये भेट होईल' - नरेंद्र मोदी

ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण 36 तासांच्या भारत दौऱ्यात मात्र या अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प 11.30 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचणार आहेत.

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी रात्री रवाना झाले. 

जवळपास 14 तासांचा प्रवास करून त्यांचे ‘एअर फोर्स वन’ हे खास विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचणार आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना रिट्विट केले आहे. यामध्ये नरेंद्र मोदींनी लिहिले आहे की, "भारत आपल्या दौऱ्याची वाट पाहत आहे. हा दौरा निश्चितच आपल्या देशांमधील मैत्री आणखी दृढ करेल. लवकरच आपली अहमदाबादमध्ये भेट होईल."

डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. इतरांच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात दोन बाबतीत लक्षणीय फरक आहे. इतरांनी भारतासोबत पाकिस्तान किंवा शेजारच्या अन्य देशांनाही भेटी दिल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प मात्र फक्त भारताचा दौरा करणार आहेत. दुसरे असे की, इतर राष्ट्राध्यक्षांचे दौरे शासकीय व राजनैतिक पातळीवरचे होते. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण 36 तासांच्या भारत दौऱ्यात मात्र या अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. यापैकी मंगळवारी दुपारी दिल्लीत डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट व चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौ-याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे.

कसा असेल कार्यक्रम?सोमवारस. ११.४० । अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमनदु. १२.१५ । साबरमती आश्रमास भेटदु. १.०० । मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमदु. ३.३० । आगऱ्याकडे रवानासा. ५.३० । ताजमहालला भेटसा.६.४५ । दिल्लीकडे प्रस्थानसा. ७.३० । दिल्लीत आगमन

मंगळवारस.१०.०० । राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागतस.१०.३० । राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजलीस.११.०० । हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटदु. १२.४० । हैदराबाद हाऊसमध्ये करारांवर स्वाक्षºया व वृत्तपत्रांना निवेदनसा. ७.३० । राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी भेटरा. ८.०० । मायदेशाकडे प्रयाण

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारच्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार?; शिवसेनेचा टोला

कराची दर्ग्याबाहेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला ठार करण्यासाठी फिल्डिंग लावली, पण...

ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी चेतक कमांडोंसह RAF तैनात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आजपासून भारत दौऱ्यावर; अहमदाबादमध्ये जय्यत तयारी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतGujaratगुजरात