शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न लावायला निघाले होते डोनाल्ड ट्रम्प... वाचाल तर हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 1:30 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होते,  असा गौप्यस्फोट अमेरिकी पॉलिटिकोनं केला आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होते,  असा गौप्यस्फोट अमेरिकी पॉलिटिकोनं केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं दुसरं लग्न लावण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच यासंदर्भात ट्रम्प यांनी भारतीय अधिका-यांना विचारणाही केली होती.डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते. त्याच वेळी त्यांनी अमेरिकेतील सर्व प्रक्रिया नव्या पद्धतीनं राबवण्याचं ठरवलं होतं. कारण त्यांना मागच्या सरकारवर विश्वास नव्हता. नरेंद्र मोदीही अमेरिकेच्या दौ-यावर येत असल्याचं समजल्यानंतर त्यांनी मोदींसंदर्भात सर्व माहिती गोळा केली होती. पॉलिटिकोच्या मते, मे 2017च्या नरेंद्र मोदींच्या अमेरिकी दौ-याआधी ट्रम्प प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीत या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात आली. तेव्हा मोदी पत्नीबरोबर न येता एकटे का अमेरिकेला येत आहेत, याची माहिती ट्रम्प यांनी भारतीय अधिका-यांकडून मिळवली. त्यावेळी त्यांनी अधिका-यांना मोदी पत्नीला सोबत का आणत नाही आहेत, याबाबत विचारणा केली. तसेच त्यांचं लग्न झालं आहे की नाही ?, असा प्रश्नही अधिका-यांना विचारला.तेव्हा अधिकारी म्हणाले, मोदींचं लग्न फार पूर्वी झालं आहे. परंतु ते स्वतःच्या पत्नीपासून दूर राहतात. त्यामुळे ते स्वतःच्या पत्नीला घेऊन अमेरिकेला येऊ शकत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी स्वतःच्या पत्नीपासून विभक्त झाल्याचं समजल्यावर त्यांनी मोदींचं दुसरं लग्न लावण्याचं ठरवलं. तसेच याची माहिती त्यांनी अधिका-यांनाही दिली. ट्रम्प यांच्या प्रस्ताव ऐकून अधिकारीही अचंबित झाले. त्यानंतर लागलीच ट्रम्प यांनी थट्टा-मस्करी करत असल्याचं अधिका-यांना सांगितलं. परंतु मस्करीत का असेना ट्रम्प यांनी मोदींचं दुसरं लग्न लावण्याची इच्छा बोलून दाखवली होती, असा दावा पोलिटिकोनं केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प