नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न लावायला निघाले होते डोनाल्ड ट्रम्प... वाचाल तर हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 13:35 IST2018-08-14T13:30:20+5:302018-08-14T13:35:14+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होते,  असा गौप्यस्फोट अमेरिकी पॉलिटिकोनं केला आहे.

donald trump wants to matchmaker for narendra modi again | नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न लावायला निघाले होते डोनाल्ड ट्रम्प... वाचाल तर हसाल!

नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न लावायला निघाले होते डोनाल्ड ट्रम्प... वाचाल तर हसाल!

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होते,  असा गौप्यस्फोट अमेरिकी पॉलिटिकोनं केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं दुसरं लग्न लावण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच यासंदर्भात ट्रम्प यांनी भारतीय अधिका-यांना विचारणाही केली होती.

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते. त्याच वेळी त्यांनी अमेरिकेतील सर्व प्रक्रिया नव्या पद्धतीनं राबवण्याचं ठरवलं होतं. कारण त्यांना मागच्या सरकारवर विश्वास नव्हता. नरेंद्र मोदीही अमेरिकेच्या दौ-यावर येत असल्याचं समजल्यानंतर त्यांनी मोदींसंदर्भात सर्व माहिती गोळा केली होती.
 
पॉलिटिकोच्या मते, मे 2017च्या नरेंद्र मोदींच्या अमेरिकी दौ-याआधी ट्रम्प प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीत या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात आली. तेव्हा मोदी पत्नीबरोबर न येता एकटे का अमेरिकेला येत आहेत, याची माहिती ट्रम्प यांनी भारतीय अधिका-यांकडून मिळवली. त्यावेळी त्यांनी अधिका-यांना मोदी पत्नीला सोबत का आणत नाही आहेत, याबाबत विचारणा केली. तसेच त्यांचं लग्न झालं आहे की नाही ?, असा प्रश्नही अधिका-यांना विचारला.

तेव्हा अधिकारी म्हणाले, मोदींचं लग्न फार पूर्वी झालं आहे. परंतु ते स्वतःच्या पत्नीपासून दूर राहतात. त्यामुळे ते स्वतःच्या पत्नीला घेऊन अमेरिकेला येऊ शकत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी स्वतःच्या पत्नीपासून विभक्त झाल्याचं समजल्यावर त्यांनी मोदींचं दुसरं लग्न लावण्याचं ठरवलं. तसेच याची माहिती त्यांनी अधिका-यांनाही दिली. ट्रम्प यांच्या प्रस्ताव ऐकून अधिकारीही अचंबित झाले. त्यानंतर लागलीच ट्रम्प यांनी थट्टा-मस्करी करत असल्याचं अधिका-यांना सांगितलं. परंतु मस्करीत का असेना ट्रम्प यांनी मोदींचं दुसरं लग्न लावण्याची इच्छा बोलून दाखवली होती, असा दावा पोलिटिकोनं केला आहे. 
 

Web Title: donald trump wants to matchmaker for narendra modi again