शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Donald Trump Visit: 'ते पूर्वी चहा विकायचे'; एवढं बोलून ट्रम्प मधेच थांबले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 4:12 PM

Donald Trump : आज आमचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. तसेच त्यामुळे भारताने आमच्या हृदयात विशेष स्थान बनवले आहे.

अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज अहमदाबाद येथे आगमन झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, या स्वागतानंतर मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ''आज आमचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. तसेच त्यामुळे भारताने आमच्या हृदयात विशेष स्थान बनवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सामान्य चायवाला म्हणून आपल्या जीवनाला सुरुवात केली होती. त्यांनी लहानपणी चहाची विक्री केली.  आज त्यांचे सारेजण कौतुक करतात. मात्र इथपर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे, हे मी सांगू शकतो. खरंतर  हा केवळ भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे,'' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांचे हे उदगार ऐकताच मोदी जागेवरून उठले. त्यांनी ट्रम्प यांचे हातात हात घेतले. दरम्यान, ''काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी ह्युस्टन येथे आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत हाऊडी मोदी कार्यक्रमात फुटबॉल स्डेडियमवर करण्यात आले होते. आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्डेडियम असलेल्या मोटेरावर माझे स्वागत करण्यात आले,'' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्य यांचे भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचाराला फाटा देत ट्रम्प यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तिन्ही दलांच्या जवानांनी ट्रम्प यांना मानवंदना दिली. तसेच विविध राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांमधून ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले.  त्यानंतर  डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीUnited StatesअमेरिकाIndiaभारत