शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 5:38 PM

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे.

ठळक मुद्देमोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ज्यात तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला लगाम घालणं आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. भारताचा हा अभूतपूर्व दौराही कधी विसरणार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच त्यांनी भारतीयांनी केलेल्या शानदार स्वागतासाठी आभारही व्यक्त केले आहेत. तीन अब्ज डॉलरचा संरक्षण करारभारत आणि अमेरिकेदरम्यान तीन अब्ज डॉलर (21559350000000 रुपये)च्या संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ज्यात अमेरिकेचे 23 एमएच 60 रोमियो हेलिकॉप्टर आणि सहा एएच 64ई अपाचे हेलिकॉप्टरचा समावेश आहे. संयुक्त विधानात ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांमध्ये संरक्षण संबंध आणखी मजबूत होणार आहेत. अमेरिकेकडून घेण्यात येणारे दोन्ही प्रकारची ही हेलिकॉप्टर्स कोणत्याही मोसमात शत्रूवर हल्ला करण्यात सक्षम आहेत. चौथ्या पिढीचं हे हेलिकॉप्टर समुद्रातील पाणबुडीलाही अचूक लक्ष्य करून तिचा नेस्तनाबूत करू शकते.  लवकरच ट्रेड डीलवर होणार चर्चा- मोदीपंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या वाणिज्य मंत्र्यांनी व्यापारसंबंधी सकारात्मक चर्चा केली आहे. आम्ही दोघांनीही ठरवलं आहे की, आपापल्या देशांच्या टीमनं या व्यापार चर्चेला अंतिम स्वरूप द्यावं. आम्ही एका मोठ्या व्यापार करारावरही चर्चा करण्यास सहमत आहोत. जागतिक स्तरावर आमचे संबंध समान लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत.  पाकिस्तानला सुनावले खडे बोलअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दहशतवादाचा उल्लेख करत म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि मी आपापल्या देशातील नागरिकांना कट्टर दहशतवादापासून वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. अमेरिका पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला प्रतिबंध घालण्यासाठी पाऊल उचलणार आहे. दोन्ही देशांचं दहशतवादाविरोधात लढाई लढण्यावर एकमत झालं आहे. त्यानंतर मोदी म्हणाले, दहशतवादाचं समर्थन करणाऱ्यांना जबाबदार धरण्यासाठी आम्ही आणखी दृढ प्रयत्न करणार आहोत. आज आमच्यामध्ये ड्रग्ज तस्करी, नार्को-दहशतवाद आणि संघटित गुन्ह्यांसारख्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यावर सहमती झाली आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी