शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"डोनाल्ड ट्रम्प भरवशाचे नाहीत ते...!"; संपूर्ण जगासाठी शांततेचा मार्ग कसा मोकळा होणार? धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:05 IST

धीरेंद्र  कृष्ण शास्त्री यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. "डोनाल्ड ट्रम्प हे भरवशाचे नेते नाहीत," असे ते म्हणाले.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री शुक्रवारी एक दिवसाच्या काशी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर पसरलेल्या अशांततेवर भाष्य करताना भारतीय सनातन संस्कृतीचे महत्त्व सांगितले. "जर संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करायची असेल, तर तसा मार्ग केवळ भारत आणि येथील सनातन संस्कृतीच दाखवू शकते," असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या मातोश्रींसह श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली.

"डोनाल्ड ट्रम्प हे भरवशाचे नेते नाहीत" -यावेळी, धीरेंद्र  कृष्ण शास्त्री यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. "डोनाल्ड ट्रम्प हे भरवशाचे नेते नाहीत," असे ते म्हणाले. याच वेळी, "ट्रम्प यांच्या बोलण्यात सातत्य नसते; ते संध्याकाळी एक बोलतात आणि सकाळी दुसरेच काही बोलतात. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवता येत नाही. ज्या प्रकारे त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून 'टॅरिफ वॉर' सुरू केले, त्यावरून ते जगात अशांतता पसरवू पाहत असल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीतून स्पष्ट होते", असा आरोपही धीरेंद्र शास्त्री यांनी यावेली केला.

"गंगा, गौ आणि गीता यांच्याशी संबंधित कोणत्याही विषयाला आमचा पूर्ण पाठिंबा" -गौसंरक्षण आणि गाईला 'राज्यमाता' दर्जा देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पाठिंबाही दर्शवला आहे. "गंगा, गौ आणि गीता यांच्याशी संबंधित कोणत्याही विषयाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल," असे त्यांनी स्पष्ट केले. शंकराचार्यांनी गाईचा मुद्दा उचलला असून, एक गोसेवक म्हणून आपण त्यांना नैतिक पाठिंबा देत आहोत. असे ते म्हणाले. तसेच, सनातन विचारधारेमध्येच जगाचा समतोल राखण्याची ताकद आहे, तेही त्यांनी यावेली ठामपणे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhirendra Shastri: Trump unreliable; India's Sanatan culture offers world peace.

Web Summary : Dhirendra Shastri criticized Trump as unreliable, citing inconsistent statements and tariff wars. He asserted that India's Sanatan culture holds the key to global peace and supported cow protection efforts, aligning with Shankaracharya's views.
टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतHinduहिंदू