Donald Trump India visit: The man, who built Motera Stadium, not invited to star-studded event | Donald Trump's India Visit : मोटेरा स्टेडियम उभारलं त्यांनाच 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाचं आमंत्रण नाही

Donald Trump's India Visit : मोटेरा स्टेडियम उभारलं त्यांनाच 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाचं आमंत्रण नाही

ठळक मुद्देअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथील मोटेरा स्टेडियमवर 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथील मोटेरा स्टेडियमवर 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, मोटेरा स्टेडियमची ज्यांनी उभारणी त्यांनाच या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नाही. 

अहमदामध्ये सर्वात मोठे स्टेडियम बांधण्यात आले आहे. हे स्टेडियम ज्यांनी बांधले, त्या मृगेश जयकृष्ण यांनाच 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाच्या आयोजकांनी निमंत्रण दिले नाही. मृगेश जयकृष्ण यांनी अवघ्या आठ महिने 13 दिवसांमध्ये या स्टेडियमची उभारणी केली आहे. याबाबतचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. 

'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाला मला आमंत्रित करण्यात आले नाही. मात्र, मोटेराला जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनताना पाहून घेतलेला आनंद इतर कोणत्याही भावनांपेक्षा 99.9% जास्त आहे, असे मृगेश जयकृष्ण यांनी म्हटले आहे. मृगेश जयकृष्ण हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि गुजरात क्रिकेट असोशिएशनचे ते माजी उपाध्यक्ष आहेत. तसेच, ते स्पोटर्स क्लब ऑफ गुजरातचे अध्यक्ष होते. 


याचबरोबर, मोटेरा स्टेडियमच्या उभारणीसाठी मृगेश जयकृष्ण यांनी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांची भेट घेतली. स्वत:च्या पक्षातील लोकांचा विरोध पत्करुन माधवसिंह सोलंकी यांनी स्टेडिअम उभारणासाठी जमीन दिल्याची आठवण मृगेश जयकृष्ण यांनी सांगितली.

नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये एक लाख 10 हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असल्याचा दावा करण्यात येतो. 36 वर्षांपूर्वी एका उजाड माळरानावर 63 रमध्ये हे स्टेडियम बांधण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump India Visit Live : वेलकम टू इंडिया... डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींची 'जादू की झप्पी'

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन

ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण!

...तर डोनाल्ड ट्रम्प कुटुंबाने रांगेत उभं राहून शिवथाळीची चव चाखली असती!

मोदी सरकार असेपर्यंत समाधान नाही, काश्मीरबाबत इम्रान खान हतबल

Web Title: Donald Trump India visit: The man, who built Motera Stadium, not invited to star-studded event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.