रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:23 IST2025-08-12T14:22:26+5:302025-08-12T14:23:56+5:30

सध्या जखमी मालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

dog got angry and attacked owner; broke off his ear and ran away | रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

Dog Attack : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहसा लोक पाळीव प्राण्यांना त्यांच्या कुटुंबाचा भाग मानतात, त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांना खायला घालतात, फिरायला घेऊन जातात. पण, गोपालगंजच्या नगर पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या पाळीव कुत्र्यावर प्रेम करणे महागात पडले.

हल्ला कसा झाला?
संदीप कुमार नावाच्या तरुणाने त्याच्या पाळीव कुत्र्याला रागावल्याने कुत्रा संतापला आणि थेट मालकावर हल्ला केला. तो कुत्रा मालकाच्या कानाला इतक्या जोरात चावला, ज्यामुळे कान तुटून वेगळा झाला. रक्ताने माखलेल्या संदीपने कसेतरी स्वतःची सुटका करुन घेतली. 

हल्ला का केला?
कुटुंबातील सदस्यांच्या मते संदीपला लहानपणापासूनच कुत्रे पाळण्याची आवड होती. अलीकडेच त्याने हा कुत्रा विकत घेतला होता. घटनेच्या दिवसी कुत्रा छतावर चढला आणि तिथून उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहून संदीपने काळजीने त्याला रागावले. त्यानंतर कुत्र्याने उडी मारुन मालकावर हल्ला केला. ही घटना इतक्या लवकर घडली की, संदीपला वाचण्याची संधी मिळाली नाही.

रुग्णालयात गोंधळ
कुटुंबातील सदस्यांनी कानाचा कापलेला भाग कापडात गुंडाळून संदीपला ताबडतोब गोपाळगंज सदर रुग्णालयात नेले. डॉक्टरांच्या पथकाने ताबडतोब उपचार सुरू केले. आपत्कालीन वॉर्डमध्ये तैनात असलेले डॉक्टर डॉ. दानिश अहमद म्हणाले की, रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु कानाच्या काही नसा खराब झाल्या आहेत. डॉक्टरांनी कान जोडण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय कुत्र्याच्या चाव्यानंतर रेबीजविरोधी लस आणि धनुर्वात इंजेक्शनदेखील दिले जात आहेत.

Web Title: dog got angry and attacked owner; broke off his ear and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.