शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 6:34 AM

कोट्यवधींची थकबाकी न भरणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना झापले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : या देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही, असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी देशातील दूरसंचार कंपन्यांना केला. तब्बल १.४७ लाख कोटी रुपयांच्या अ‍ॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (समायोजित सकळ महसूल)बाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला. दूरसंचार कंपन्या व त्यांच्या संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश देताना ही थकीत रक्कम १७ मार्चपूर्वी जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाने २४ आॅक्टोबर रोजी एजीआरसंबंधी आदेश दिला होता. तथापि, कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यातच दूरसंचार मंत्रालयातील एका अधिकाºयाने कंपन्यांविरोधात सक्तीची कारवाई न करण्याच्या सूचना देणारा आदेश अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल व इतरांच्या नावे काढल्याचे समोर आले. हा आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. आदेश मागे न घेतल्यास त्या अधिकाºयास तुरुंगात पाठवू, असा सक्त इशाराही न्यायालयाने दिला.

एजीआरचा भरणा करण्यासाठी आणखी वेळ मागणारी याचिका सुनावणीसाठी आली असता न्या. अरुण मिश्रा यांच्या पीठाने संताप व्यक्त करून म्हटले की, एजीआरच्या पुनर्विचाराच्या याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. तरी एक रुपयाही भरला नाही. हे अडथळे कोण निर्माण करीत आहेत, हेच कळेनासे झाले आहे. या देशात कायदा अस्तित्वात नाही का? देशात राहण्यापेक्षा देश सोडून जाणे श्रेयस्कर आहे. देशात ज्या पद्धतीने घटना घडत आहेत, त्यामुळे आमचा विवेक डळमळीत झाला आहे.तो आदेश मागे, थकबाकीतत्काळ भरण्याचे आदेशच्न्यायालयाच्या तंबीनंतर दूरसंचार विभागाने डेस्क अधिकाºयाचा कंपन्यांवर ‘सक्ती न करण्या’च्या सूचना देणारा आदेश तत्काळ मागे घेतला. शुक्रवारी मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत रकमेचा भरणा करण्याचे आदेशही कंपन्यांना दिले.च्सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे या दूरसंचार कंपन्या पूर्णत: हबकून गेल्या आहेत. आपण २0 फेब्रुवारीपर्यंत १0 हजार कोटी रुपये जमा करू, असे एअरटेलने म्हटले आहे. या निर्णयानंतर व्होडाफोन-आयडियाचे शुक्रवारी दुपारनंतर शेअर ११ टक्क्यांनी कोसळले.भरणा करणारी जिओच!व्होडाफोन-आयडियाकडे एजीआरचे सर्वाधिक ५0 हजार कोटी रुपये थकले आहेत. एअरटेलकडे ३५ हजार ५00 कोटी, तर टाटा टेलिसर्व्हिसेसकडे १४ हजार कोटी रुपये थकले आहेत. जिओने मात्र आपली रक्कम भरली आहे.च्दूरसंचार कंपन्या तोट्यात असून, मध्यंतरी व्होडाफोनने भारतातून गाशा गुंडाळण्याचीही भाषा केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ती आणखी अडचणीत आली आहे. त्यामुळे ती देशातील कारभार बंद करेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAirtelएअरटेलIdeaआयडियाVodafoneव्होडाफोनJioजिओ