रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:51 AM2022-04-22T10:51:25+5:302022-04-22T10:51:56+5:30

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Doctors are not always responsible for a patient's death; says Supreme Court | रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

Next

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : केवळ रुग्णाला वाचवता आले नाही म्हणून, वैद्यकीय निष्काळजीपणासाठी डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. डॉक्टरांनी वाजवी काळजी घेणे अपेक्षित आहे, परंतु संकटावर मात करून रुग्ण घरी परत येईलच याची खात्री कोणीही व्यावसायिक देऊ शकत नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांना ९००-१००० पेक्षा जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा अनुभव होता. मात्र, नवीन कांत यांचे ३ फेब्रुवारी १९९६ रोजी निधन झाले.

त्यांच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात पतीचा शस्त्रक्रियेनंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप  करत उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि हॉस्पिटलवर  सुमारे ९५ लाखांचा दावा दाखल केला. 

कमिशनने ही तक्रार फेटाळून लावताना डॉक्टरांची तज्ज्ञ टीम त्यांच्या दीर्घ आजारानंतर त्याला वाचवू शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला म्हणजे ऑपरेशन नंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. अपिलात सर्वोच्च न्यायालयाने या निष्कर्षाशी सहमती दर्शवत अपील फेटाळले.

- डाॅक्टरांनी एक  उपचाराऐवजी दुसऱ्याला प्राधान्य दिले म्हणून  त्यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

- वैद्यकशास्त्रामध्ये, उपचाराचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. यात  मतभेदही असू शकतात. तथापि, उपचार करताना डाॅक्टरांनी त्यांच्या सर्वोत्तम कौशल्याप्रमाणे उपचार केले काय हे महत्त्वाचे आहे. उपचार करण्यासाठी ते सक्षम व पात्र असणे  आवश्यक आहे.

- डॉक्टर फक्त तेव्हाच जबाबदार ठरतील,  जेव्हा त्यांनी क्षमतेचा व त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा वाजवी वापर  केला नसेल. 
-न्यायमूर्ती, अजय रस्तोगी आणि अभय एस. ओक
 

 

Web Title: Doctors are not always responsible for a patient's death; says Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.