बापरे! कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:05 PM2021-03-18T15:05:09+5:302021-03-18T15:14:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून अनेकांनी लसीचा डोस घेतला आहे. याच दरम्यान एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

doctor found coronavirus infected in jharkhand jamshedpur after taking both doses of covid 19 vaccine | बापरे! कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ 

बापरे! कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ 

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,14,74,605 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 172 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,59,216 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून अनेकांनी लसीचा डोस घेतला आहे. याच दरम्यान एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावरही डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्हा मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांनी कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतले. मात्र त्यानंतरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी कोरोना लसीवरील पहिला डोस हा 19 जानेवारीला घेतला होता. त्यानंतर दुसरा डोस हा 20 फेब्रुवारीला घेतला होता. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

डॉक्टरांनी घेतलेल्या पहिला आणि दुसऱ्या डोसमध्ये 45 दिवसांचे अंतर नव्हते. यामुळेच त्यांना कोरोना संसर्ग झाला असं सांगण्यात येत आहे. डॉक्टरांची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर जमशेदपूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपासून करोना रुग्णसंख्या घटली होती. पण आता गेल्या काही दिवसांपासून जमशेदपूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा विस्फोट झाला असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

विस्फोट! देशात कोरोना झपाट्याने वाढतोय, गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण, 101 दिवसांनी झाली मोठी वाढ

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 172 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल 101 दिवसांत ही मोठी वाढ झाली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटीवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,59,216 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (18 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,14,74,605 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. 

Web Title: doctor found coronavirus infected in jharkhand jamshedpur after taking both doses of covid 19 vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.