शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चीनचं काहीतरी करा... अभिनेत्री रिचा चड्डाची थेट गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 20:02 IST

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष कार्यक्रमात अमित शहा यांनी विविध मुद्यांवर चर्ची केली

मुंबई - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. देशात या व्हायरसचा धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 1 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे चीनमधून आलेल्या कोरोनाचं संकट असताना, दुसरीकडे सीमारेषेवर चीनी सैन्याचं संकट आहे. त्यामुळे, चीनला धडा शिकविण्याची मागणी सोशल मीडियातून सरकारकडे होत आहे. आता, अभिनेत्री रिचा चड्डानेही केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चीनचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली आहे.   

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष कार्यक्रमात अमित शहा यांनी विविध मुद्यांवर चर्ची केली. कोरोनासह महाराष्ट्रातील परिस्थितीवरही शहा यांनी भाष्य केलं. मोदी सरकारच्या दोन वर्षातील कार्याचा आढावा देत एनआरसी, सीएए, आर्टीकल ३७० या मुद्द्यांनाही शहा यांनी हात घातला. सध्या, चीनसोबत लडाख सीमारेषेवर सुरु असलेल्या वादावरुन शहा यांना विचारण्यात येत आहेत.   चीनसोबत लडाख सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लवकरच या समस्येचा तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. लष्करी व मुत्सद्दी पातळीवर दोन्ही देशांमधील वाटाघाटी सुरूच आहेत. आज देशाकडे सक्षम नेतृत्व आहे. देशाची मान झुकू देणार नाही. देशातील जनतेला यावरही विश्वास आहे, असेही संरक्षणमंत्र्यानी म्हटले आहे. मात्र, गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप चीनसोबतच्या वादावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. त्यामुळे अभिनेत्री रिचा चड्डा हिने थेट आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अमित शहा यांचा फोटो शेअर करत, चीनचं काहीतरी करा... अशी मागणी केली आहे. 

आम्ही कुणाचं काही घेऊ इच्छित नाही, पण आमचं कोणी काही घेण्याचा प्रयत्न केल्यास चांगलच उत्तर दिलं जाईल, असे अमित शहांनी म्हटलं होतं. अमित शहांच्या या विधानाला ट्विटरवरुन शेअर करत, रिचा चड्डा यांनी चीनचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाbollywoodबॉलिवूडRicha Chadhaरिचा चड्डाchinaचीन