शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांवेळीच शरद पवारांची आठवण येते का? नाव, फोटो वापरू नका; अजितदादा गटाला ‘सुप्रीम’ दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 05:43 IST

‘घड्याळ’चिन्ह काढण्याची वेळ आणू नका, पर्यायी चिन्हाचा विचार करून ठेवा; सर्वोच्च न्यायालयाची तंबी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तुम्हाला निवडणुकीच्याच वेळी शरद पवारांची आठवण येते का, असा सवाल करीत तुमचे ‘घड्याळ’ चिन्ह काढून घ्यावे लागेल, अशी वेळ आणू नका, अशा सज्जड शब्दांत आज सर्वोच्च न्यायालयानेअजित पवार गटाला तंबी दिली. 

शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्रे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापरणार नाही, अशी बिनशर्त लेखी हमी अजित पवार गटाने शनिवारपर्यंत दाखल करण्याचे आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, १९ मार्च रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव 

तसेच निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ बहाल करीत अजित पवार गटाला अधिकृत पक्ष असल्याची मान्यता देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका शरद पवार यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान अजित पवार गटाकडून अजूनही शरद पवार यांच्या फाेटाेचा वापर केला जात आहे, असा आराेप शरद पवार यांच्यावतीने अभिषेक सिंघवी यांनी केला.

‘घड्याळा’ऐवजी पर्यायी चिन्हाचा विचार करून ठेवा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला तुतारी चिन्ह दिले असून अजित पवारांच्या पक्षालाही नवे चिन्ह दिले जावे, अशी मागणी सिंघवी यांनी केली. त्यावर आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि मनिंदरसिंह यांनी केला.

शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातच याचिका केली असून, त्यावर आम्हाला निर्णय द्यायचा आहे. समजा ऐन निवडणुकीदरम्यान आम्ही निवडणूक आयोगाचा निकाल रद्दबातल केला तर काय होईल? अजित पवार गटाने घड्याळाऐवजी पर्यायी निवडणूक चिन्हाविषयीही विचार करावा, असा आमचा सल्ला असेल, अशी मौखिक टिप्पणी न्या. सूर्यकांत यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार’ हे पक्षाचे नाव तसेच ‘तुतारी’ हे चिन्ह राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत वापरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली परवानगी २७ फेब्रुवारी रोजी संपली आहे.

तुम्हाला निवडणुकीच्या वेळीच शरद पवारांची आठवण येते का?

- प्रचारात शरद पवारांचे छायाचित्र वापरा, असे आवाहन  मंत्री छगन भुजबळ कार्यकर्त्यांना करीत असल्याची तक्रार शरद पवार यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी केली. 

- त्यावर तुम्हाला निवडणुकीच्या वेळीच शरद पवारांची आठवण येते का, अशा शब्दांत न्यायालयाने रोष व्यक्त केला. 

- तुमचे घड्याळ चिन्ह काढून घ्यावे लागेल, अशी वेळ आणू नका, असा इशाराही न्यायालयाने दिला. दरम्यान, समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे अवघड असल्याचा दावा अजित पवार यांच्या वकिलांनी केला.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४