शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फाईव्ह स्टार हॉटेलचा नाही, सरकारी सोयींचाच वापर करा - मोदींची मंत्र्यांना ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 13:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा पक्षाच्या नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबतच प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असणाऱ्यांची झाडाझडती घ्यायलादेखील पंतप्रधान मोदी मागेपुढे पाहात नाहीत.

नवी दिल्ली, दि. 20 - पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा पक्षाच्या नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबतच प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असणाऱ्यांची झाडाझडती घ्यायलादेखील पंतप्रधान मोदी मागेपुढे पाहात नाहीत. पंतप्रधान मोदींकडून मंत्री आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सूचनांचीही अनेकदा चर्चा होते. पंतप्रधान मोदी सरकारच्या कारभाराविषयी अतिशय सजग असल्याचे चित्र आतापर्यंत वारंवार पाहायला मिळाले आहे. याचाच प्रत्येय आणखी एकदा आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी दौऱ्यादरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलचा वापर करणाऱ्या मंत्र्यांना ताकीद दिली आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना काही सुचना केल्या होत्या. यामध्ये मंत्र्यांनी फाईव्ह स्टार हॉटेलचा वापर टाळावा असेही सांगितले. ज्यावेळी सरकारी दौऱ्यावर जात असता त्यावेळी हॉटेलचा वापर न करता सरकारी सोयींचाच वापर करा अशी ताकीद दिली आहे.मंत्री सरकारी दौऱ्यादरम्यान सार्वजनिक क्षेत्राच्या सोयीसुविधांचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाल्या होत्या. यामुळे नाराज झालेल्या मोदींनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांची झाडाझडती घेतली. सरकारी दौऱ्यादरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य करण्याच्या सवयींपासून दूर राहा, असे मोदींनी यावेळी मंत्र्यांना सांगितले. तसेच काही मंत्री निमशासकीय गाड्यांचा वापर खासगी कामांसाठी करत असल्याची तक्रार आपल्याकडे आल्याचे यावेळी त्यांनी मंत्र्यांना सांगितले. ही थेरं यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, असा सज्जड दमच मोदींनी यावेळी उपस्थित मंत्र्यांना दिला.भ्रष्टाचारविरोधात झिरो टॉलरन्स धोरणाबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी मंत्र्यांना बजावून सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकींना अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. यादरम्यान पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल, अशी कुठलीही घटना घडता कामा नये असे मोदींना वाटते. यामुळेच मंत्र्याना ते वारंवार सावध राहण्याच्या सूचना देत आहेत.यापूर्वीही सदेच्या अधिवेशनादरम्यान अनुपस्थित राहणाऱ्या भाजपच्या खासदारांना मोदींनी फैलावर घेतले आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान अनुपस्थितीत राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत सुनावले होते. पंतप्रधानांनी भाजपच्या खासदारांना संसदेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. संसदीय कामकाजादरम्यान सतर्क आणि सजग राहण्याचा सल्लादेखील मोदींनी खासदारांना दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा