पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 10:07 PM2017-07-25T22:07:53+5:302017-07-25T22:16:35+5:30

pantaparadhaana-naraendara-maodainnai-kaelai-pauuragarasata-bhaagaacai-havaai-paahanai | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

Next

अहमदाबाद, दि. 25 -  देशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरात राज्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तसेच, पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते.

आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये पोहचले. त्यानंतर त्यांनी राज्यातील पूरग्रस्त भागाई हवाई पाहणी करुन पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच, पुरात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. याचबरोबर, केंद्र सरकारकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला 500 कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 


उत्तर गुजरातमधील सौराष्ट्र , बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नदी, नाले व रस्ते पाण्याखाली गेल्याने गुजरातमधील रस्ते व रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 900 जनावरांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर आणि हवाईदलाला पाचारण करण्यात आले आहे. 
मोर्बी, राजकोट, सुरेंद्रनगर, बनासकांठा आणि अहमदाबाद जिल्हे पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी सरकारी इमारती व शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजप्रवाह ठप्प झाले आहेत. 19 राज्यमार्ग आणि 102 अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.


दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही  नुकतीच सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पूरग्रस्त भागात अन्नाची पाकिटे व पाणी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा कॉलेजस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत.


Web Title: pantaparadhaana-naraendara-maodainnai-kaelai-pauuragarasata-bhaagaacai-havaai-paahanai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.